साताऱ्यात पसरणी (ता वाई) इथल्या भैरवनाथ नगर येथे ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी कारखान्याला गाळप करण्यासाठी ट्रकमधील भरलेला संपूर्ण ऊस आणि ट्रक कालव्यात कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रस्ता अरुंद असल्याने ट्रकचे चाक खड्ड्यात अडकले आणि ट्रक एका बाजूला कलला. ट्रकला वाचवण्याचे चालकाने आणि स्थानिकांनी प्रयत्न केले, मात्र ट्रक वाचवण्यात अपयश आले.
आज दुपारी भैरवनाथ नगर पसरणी येथे उसाची तोड सुरू होती ऊस तोड झाल्यानंतर ट्रक भरून साखर कारखान्याकडे रवाना होत असताना धोम धरणाच्या डाव्या कालव्यात ऊसाने भरलेला ट्रक कोसळला.
रस्त्यावर चढ-उतार असल्याने ट्रक एका बाजूला कलला आणि कालव्यात कोसळला. ही माहिती कालवा समितीला समजताच कालव्यातील पाणी कमी करण्यात आले आणि रात्री उशिरा ट्रक कालव्यातून बाहेर काढण्यात आला.
0 Comments