Ticker

6/recent/ticker-posts

धानोरा खुर्द ते कुंभी रस्त्याच्या खड्ड्यात संतप्त जनतेने लावले बेशर्मी चे झाड

 आसेगाव पो स्टे वार्ताहर धानोरा खुर्द ते कुंभी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी  उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग  मंगरूळपीर चे अधिकारी एस के काळे यांनी रास्ता रोको आंदोलन कांना लेखी पत्र देऊन आठ दिवसात रस्त्याच्या  दुरुस्तीचे काम पूर्ण करून देतो असे लेखी पत्र दिल्यानंतर सुद्धा एक महिना लोटला तरी रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली नाही तेव्हा संतप्त आंदोलकांनी रस्त्याच्या खड्ड्यात बेशर्मी चे झाड लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला 
 याबाबत सविस्तर असे धानोरा खुर्द ते कुंभी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले या रस्त्यावर रोजंदारी करणारे शहराच्या ठिकाणी अनेक मजूर काम करण्यासाठी जातात त्यांना अतोनात त्रास होत आहे संध्याकाळी घरी परत येतो किंवा नाही त्यांच्या कुटुंबाला काळजी पडत आहे हा रस्ता हा रस्ता शेवटच्या घटका मोजत असून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दृष्टीला काम सुरुवात केली नाही तसेच  रस्त्यावर काही ठिकाणी चाळण झाली असल्या कारणामुळे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत तेव्हा संतप्त जनतेने 14 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्याची दखल घेऊन मंगरूळपीर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी एस के काळे यांनी 11फेब्रुवारी रोजी आसेगाव येथील पोलीस स्टेशन कार्यालयात ठाणेदार संदिप नरसाळे यांच्या समक्ष आंदोलन कार्यकर्त्यांना रस्त्याच्या दुरुस्तीचे आठ दिवसात काम करतो असे लेखी पत्र दिले होते परंतु आंदोलनकर्त्यांनी दुरुस्तीच्या कामाची एक महिना झाला तरीपण  रस्त्याच्या दुरुस्तीचे कामाला सुरुवात झाली  नाही या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेमध्ये वाढ होत तरीसुद्धा कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम  सुरू केले नाही शेवटी संतप्त जनतेने खड्ड्यांमध्ये बेशर्मी ची झाडे लावून ठेकेदार व अधिकारी यांचे स्वागत केले आहे यावर सुद्धा अधिकाऱ्यांना जाग आली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना बेशर्मी चा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात येईल असा इशारा संतप्त जनतेने व आंदोलनकर्त्यांनी दिला आहे यावेळी संतप्त जनता शिवनी द सरपंच डॉक्टर भगवान भेंडेकर विष्णू फड भास्कर भाऊ भेंडेकर गजानन ज्ञानदेव भेंडेकर साकिर शेख संदीप पुंडलिक ठाकरे शाकीर शेख फिरोज पटेल सय्यद अहमद शेषराव राठोड दीपक भालेराव राजमंगल भेंडेकर हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments