वाशिम दि.19
विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या ठळक मुद्द्यांचे वाचन 17 मार्च रोजी महात्मा फुले सभागृहात करण्यात आले.तसेच यावेळी श्री.सिंह यांनी जल जीवन मिशन व महाआवास योजनेच्या कामांचा आढावा घेतला.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,उप आयुक्त (आस्थापना) शरद कुलकर्णी, प्रभारी सहाय्यक आयुक्त (तपासणी) सुधाकर दवंडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तूषार मोरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) विवेक बोंद्रे,पंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.विनोद वानखडे, महिला व बालकल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments