Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम शहरात जबरी चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

वाशिम शहरात जबरी चोरी करणारी टोळी
जेरबंद करुन ४ गुन्हयाची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश. मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी गुन्हे गारी प्रवृत्तीला आळा बसावा याकरीता दिवसा / रात्री गस्त
बाढवून पोलीसाचा गुन्हेगारांवर असलेला वचक कायम ठेवला आहे. दिनांक १०/०३/२०२२ रोजी वाशिम शहरात १) फु अक्षरा प्रशांत तोडकर हि तिचे घराबाहेर मोबाईलवर बोलत असताना बाईक वरून जात असलेल्या दोन इसमापैकी मागे बसलेल्या एका इसमाने तिच्या हातातील मोबाईल जबरीने चोरून नेला २) विठठल अर्जुन थोरात वय ३० वर्ष हे पोस्ट ऑफीस चौकातुन बस स्टॅन्ड कडे मोबाईलवर बोलत जात असताना मो/ सा वरून मागुन येऊन हातातुन मोबाईल हिसकावुन घेतला ३) कृष्णा गजानन पारेकर वय २५ वर्षे रिसोड नाका ते पाटणी कमर्शीयल येथे मोबाईल वर बोलन जात असताना मो / सा वरुन मागुन येऊन मोबाईल हिसकावुन घेऊन गेले. सदर बाबत पोस्टे बाशिम शहर येथे कलम ३९२ भादवी प्रमाणे अपन १९०/२२,१९१/ २२.१९२/२२ असे तिन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मा. पोलीस अधिक्षक यांनी आदेश दिल्याने पोनि स्थागुशा यानी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून मिळालेल्या गोपनिय माहिती वरुन आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नामे आकाश भारत रोकडे रा झाकल वाडी ता जि वाशिम याला ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी त्याचे दोन साथिदार नामे गोलु उर्फ दिपक सुनिल खिल्लारे, क्य १९ वर्षे रा क्रांतीनगर वाशिम संघपाल भारत कावळे य भिमनगर यांचे गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेले एकुण ५ मोबाईल एकुण ५०,०००/- १शाईन व १ पल्सर मोटार सायकल अशा २ मोटार सायकल एकुण १,००,०००/- असा अंदाजे एकुण १,५०,०००/- चा माल ताब्यात घेण्यात आले असून वरील तिन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत. नमुद आरोपी याना पुढील तपासाकरीता वाशिम शहर पोलीस यांचे ताब्यात देण्यात आले.

तसेच दिनांक २७/०२/२०२२ रोजी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे फिर्यादी यश अनिल सरकटे रा वाशिम यांचे डोळयात चटणी पावडर फेकुन मारहाण करून फिर्यादीचा १,७५,००००/- रू चा डिजीटल फोटो कमेरा व एक मोबाईल किमत अंदाजे २०,०००/- रु चा असा एकुण १,९५,००००/- रूचा मुद्देमाल जबरीने चोरून नेणाऱ्या तिन विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या ताब्यातुन गुन्हयात चोरून नेलेला कॅमेरा आणि मोबाईल १,९५,००००/- रूचा मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेली मोटार सायकल किंमत ५०,०००/- असा एकुण २,४५,००००/- जप्त करून पोस्टे वाशिम शहर ला अप.क. १४९/२०२२ कलम ३९४ भादंवि हा गुन्हा उघडकीस आणला आहे. एकुण ५ गुन्हयात ३,९५,०००/- चा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री भामरे साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे पथकातील सपोनि अतुल मोहनकर, विजय जाधव, पोहेका सुनिल पवार, संतोष कंकाळ, किशोर चिंचोळकर, दिपक सोनवणे, गजानन अवगळे पोना अमोल इंगोले, प्रशात राजगुरु, राजेश राठोड, राजेश गिरी, गजानन गोटे, पोका संतोष शेणकडे शुभम चौधरी किशोर खडारे, निलेश इंगळे महीला पोलीस पूजा पडवाळ पाडका चालक मिलिंद गायकवाड, सायबर सेल येथील पोका प्रशांत चौधरी गोपाल चौधरी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments