भुसावळ-- येथील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ.डि.एम.ललवाणी यांनी महाराष्ट्र वाणिज्य प्राध्यापक असोसिएशन या संघटनेच्या फैजपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत आपले पुत्र स्वर्गीय स्वप्नील ललवाणी त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्रातील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील सामाजिक, शैक्षणिक, समाज सेवा बजावणाऱ्या तरुण प्राध्यापकाला हा पुरस्कार दरवर्षी देण्यात यावा यासाठी त्यांनी परिषदेकडे 51 हजार रुपयांची रोख देणगी सुपूर्द केली. ज्या योगे स्व.स्वप्निल च्या स्म्रुती कायम राहतील.
परीषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.जी.एम.तल्हार,
प्राचार्य डॉ.जि.वाय शितोळे, प्रा. डॉ. बबनराव तायवाडे,
प्रा.डाॅ.कुलदीप शर्मा,प्राचार्य महेश जोशी,प्रा.डाॅ.शिवारे, आमदार शिरीष भाऊ चौधरी, आमदार सत्यजीत तांबे, खासदार उल्हासराव पाटील,संस्था पदाधिकारी, आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला .
परिषदेने या तत्पर देणगीची दखल घेऊन तुरंत याच वर्षी हा पुरस्कार प्रा.डाॅ.अशोक कोकाटे व प्रा.डाॅ. निषेध विलेकर यांना प्रदान करण्यात आला. प्रा.डाॅ. डी.एम. ललवाणी यांनी आपल्या मुलाच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित सर्व प्राध्यापकांनी स्वागत केले.
याप्रसंगी प्रा. ललवाणी यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून त्याच्या अभ्यासु,हुशारी,
सेवाभावी व्रुत्तीच्या आठवणी जागवल्या. त्यांना या प्रसंगी गहिवरून आले होते व सर्व सभागृह भावनावश झालेले दिसून आले.असोशिएशन पदाधिकार्यांनी त्यांची विनंती मान्य केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल धनाजी नाना महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. पी. आर .चौधरी यांनी त्यांचा सत्कार केला.
0 Comments