Ticker

6/recent/ticker-posts

भाजपाचा हल्लाबोल ; खुला झाला उड्डाणपुलआमदार पाटणी यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा एल्गार

उड्डाणपुल सुरू झाल्यामुळे नागरीकांमध्ये समाधान
बांधकाम पुर्ण होवुनही सत्ताधा-यांना केवळ उद्घाटनसाठी वेळ मिळत नसल्यामुळे वाहतुकीसाठी बंद असलेला पुसद मार्गावरील उड्डाणपुल आज भरतीय जनता पार्टीने वाहतुकीसाठी खुला केला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्या नेतत्वात, आ. लखन मलिक, राजु पाटील राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करून सदर उड्डाणपुलावरून वाहतुक सुरू करून दिली त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणा-यांना होणारा नाहक त्रास संपुश्टात आला असुन नागरीकांच्या चेह-यावर समाधान झळकत आहे.
वाषिम वरून पुसद, कारंजा, मंगरूळपीर, अमरावती व नागपुरसह वाषिम तालुक्यातील काही गावांना जाणा-या नागरीकांना रेल्वे क्रॉसिंगमुळे नाहक त्रास सोसावा लागत होता. कधी-कधी तासंतास रेल्वे फाटक बंद राहत असल्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजुंना वाहनाची भली मोठी रांग लागत होती. अनेक रूग्णांना तर वाहतुकीच्या कोंडीमुळे आपले प्राणही गमवावे लागले. नागरीकंाना होणारा नाहक त्रास बघता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी यांनी सदर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुल व्हावा यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री मा.ना. श्री नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा सुरू केला होता. सदर पाठपुराव्याची दखल घेत गत पाच वर्शापुर्वी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने येथील उड्डाणपुलाला मंजुरात दिली होती. त्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली महाराश्ट्रात भाजपाचे सरकार होते तोवर कामाची गती चंागली होती. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हि गती मंदावली. मध्यंतरी काही लोकप्रतिनिधी व राजकारण्यांचे कंत्राटदारांषी खटके उडाल्यामुळे पुलाचे बांधकामही थांबले होते. परंतु त्यानंतरही आ.पाटणी यांनी पाठपुरावा करून काम मार्गी लावले. गत दिड महीन्यापासुन सदर उड्डाणपुल बांधकाम होवुन पुर्ण झालेला आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधा-यांना उदघाटनासाठी वेळ मिळत नसल्यामुळे पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आ. पाटणी यांनी सदर पुलाचे त्वरीत लोकार्पण करून जनतेला होणारा त्रास कमी करावा यासाठी प्रषासन व सत्ताधा-यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या मविआ सरकारला लोकार्पण करण्याची जाग येत नव्हती. जनतेला होणारा त्रास असह्य झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आ. राजेंद्र पाटणी यांचा नेतृत्वात तर आ.लखन मलिक, राजु पाटील राजे माजी आ. पुरूशोत्तम राजगुरू यांच्या उपस्थितीत हल्लाबोल करून सदर उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला केला. यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात घोशणाबाजी करण्यात आली. आंदोलनात पुरूशोत्तम चितलांगे, जिल्हा सरचिटणीस नागेष घोपे, षाम बढे , प्रा. सुनिल काळे, मंडळ अध्यक्ष प्रल्हाद गोरे, राहुल तुपसांडे, ललित चांडक, डॉ. राजिव काळे, ठाकुरसिंग चव्हाण, रविंद्र ठाकरे, षाम खोडे, सुरेष मुंडे, षंकरराव बोरकर, जि.प.सदस्य उमेष ठाकरे, अर्चना डिगांबर खोरणे, अषोक चव्हाण, अजय जयस्वाल, संकेत नाखले, विजय पाटील, डॉ.विवेक माने, मिठुलाल षर्मा, बाळु मुरकुटे, धनंजय हेंद्रे, संदिप पिंपरकर, प्रा.विरेंद्र ठाकुर, विजय पाटील काळे, मिनाताई काळे, करूणाताई कल्ले, अंजली पाठक, पायल ललित तिवारी, प्राजक्ता माहीतकर, रूपालीताई देषमुख, आदिंसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होेते.
बॉक्स
पुसद, अमरावती, नागपुर, कारंजा, मंगरूळपीर व वाषिम तालुक्यातील नागरीकांना होणारा रेल्वेगेटचा त्रास बघता आपण केंद्रीय मंत्री मा.ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुल मंजुर करून आणला. मविआ सरकारच्या दिरंगाईमुळे पुल पुर्ण व्हायला तिन वर्शा ऐवजी पाच वर्श लागलेत. महीनाभरापासुन पुल पुर्ण होवुन केवळ उदघाटना अभावी वाहतुकीसाठी बंद होता. सत्ताधा-यांना वेळ नसल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नागरीकंाची गैरसोय टाळण्यासाठी आज पुल वाहतुकीसाठी खुला केला.
आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाध्यक्ष भाजपा

Post a Comment

0 Comments