कारंजा: स्थानिक आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. कविता निर्मलसिंह ठाकूर यांना जागतिक महिला दिना निमित्त नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रस्तरीय नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कलासाधना सामाजिक संस्थेद्वारे कराडी समाज भवन, कामोठे, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डाॅ. कविता चौथमोल, झी मीडियाच्या अनुपमा खानविलकर, सहायक पोलीस निरीक्षक रत्ना खंडेलवाल, अभिनेत्री संजना पाटील, पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका नेत्रा पाटील यांच्याहस्ते महिला आणि ग्रामीण मुलींकरिता करीत असलेल्या सामाजिक कार्यासाठी कविता ठाकूर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आदिशक्ती संस्थेच्या वतीने ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांसाठी गेल्या सात वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येतात. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तकपेढी योजना, विद्याश्री शिष्यवृत्ती योजना, करीयर मार्गदर्शन शिबीर ,आदिशक्ती पुरस्कार, स्वयम कौशल्य विकास योजना इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून 2000 पेक्षा जास्त ग्रामीण विद्यार्थ्यांना आतापर्यंत मदत करण्यात आली आहे. कविता स्वतः ऊच्चविद्दा विभूषित असून ग्रामीण विद्यार्थ्यीनींने शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर ऊभे रहावे याकरीता आपली नोकरी, संसार सांभाळून आपल्या पतीच्या सोबत सतत प्रयत्नशील असतात.
आदिशक्ती संस्थेला सदैव मदत करनारे दानदाते, संस्थेचे सर्व कार्यक्रम समन्वयक, संस्थेच्या योजना प्रभाविपणे राबविणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यानेच हे सामाजिक कार्य सुरू आहे आणि हा पुरस्कार आम्हाला अजून जोमाने कार्य करण्यास प्रेरणा देईल अशे या प्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केले.
0 Comments