Ticker

6/recent/ticker-posts

भटक्या जमातीतील मुला मुलींसोबत अश्विनी ताई औताडे यांनी केली रंगपंचमी साजरी

 म़गरुळपीर येथे बस स्टॅंड परिसरातील भटक्या जमातीतील मुलांना व मुलींना लिहिता वाचता यावे या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून जिव्हाळा फाऊंडेशन च्या अध्यक्षा अश्विनी ताई राम औताडे यांनी शिकवण्या सोबत रंगपंचमी साजरी केली. या ठिकाणी येऊन वेळोवेळी  त्या मुलांना शिकवतात तसेच त्यांना स्वछेतेचे व योगाचे धडे देतात. लाकडाऊन च्या काळात पण हे काम  चालू होते . वेळोवेळी  त्या मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करतात. पण आता मुलामुलींची संख्या वाढली आहे.  या मध्ये दोन अपंग मुले आहेत . यांना उघड्या वर शिकवण्या चे काम चालू होते. हे बघुन त्यांचा पालक वर्ग जागा करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत 
समाजसेविका अश्विनी ताई सगळ्यांना हात जोडून विनंती करतात की या मुलांचां शिक्षणासाठी होईल त्या परीने मदत करावी जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज् तुमच्या एका छोट्याशा मदती मुळे कोणाच तरी आयुष्य बनेल. या रंगपंचमी कार्यक्रमात हिंदू-मुस्लीम ऐक्य दीसुन आले . सायदा नावाच्या मुलीने रंग लावत हा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला 
तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भटक्या जमातीतील मुला-मुलींच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी समोर यावे व मदतीचा हात पुढे करावा

Post a Comment

0 Comments