Ticker

6/recent/ticker-posts

राजे, जनतेच्या जिवावर उठले !भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांचा आरोपपालकमंत्री जनतेचे तारक आहेत की मारक

वाशिम : गत तिन महिण्यांपासून पुसद रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. मात्र पालकमंत्र्यांना  उद्धाटनासाठी वेळ नसल्यामुळे हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी बंद आहे. जनतेचा त्रास पाहता भारतीय जनता पार्टीने  उड्डाणपूल खुला केला खरा पण श्रेयाच्या खिरापतीसाठी  सरकारी रेट्यामुळे प्रशासनाने पुल पुन्हा बंद केला. पालकमंत्र्यांच्या लेखी  जिल्हावासीयांच्या जिवापेक्षा श्रेय महत्वाचे आहे.पालकमंत्री जनतेचे तारक असतात, परंतु राजे तुम्ही तर मारक झालात, श्रेयासाठी  जनतेच्या जिवावर उठलेत असा आरोप भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी केला.
वाशिमवरून पुसद, कारंजा, मंगरूळपीर, अमरावती व नागपुर मार्गावरून जाणाऱ्या नागरीकांना रेल्वे क्रॉसिंगमुळे नाहक त्रास सोसावा लागत होता. कधी-कधी तासंतास रेल्वे फाटक बंद राहत असल्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजुंना वाहनाची भली मोठी रांग लागत होती. अनेक रूग्णांना तर वाहतुकीच्या कोंडीमुळे आपले प्राणही गमवावे लागले. नागरीकांना होणारा त्रास बघता भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी सदर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुल व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा केला होता. सदर पाठपुराव्याची दखल घेत गत पाच वर्षापूर्वी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने उड्डाणपुलाला मंजुरात दिली होती. त्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार होते तोवर कामाची गती चांगली होती. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हि गती मंदावली. मध्यंतरी काही लोकप्रतिनिधी व राजकारण्यांचे कंत्राटदारांशी खटके उडाल्यामुळे पुलाचे बांधकामही थांबले होते.  परंतु त्यानंतरही आ.पाटणी यांनी पाठपुरावा करून काम मार्गी लावले. गत दिड महीन्यापासुन सदर उड्डाणपुल बांधकाम होवुन पुर्ण झालेला आहे. परंतु पालकमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्यामुळे पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. आ.पाटणी यांनी सदर पुलाचे त्वरीत लोकार्पण करून जनतेला होणारा त्रास कमी करावा यासाठी प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या मविआ सरकारला लोकार्पण करण्याची जाग येत नव्हती. जनतेला होणारा त्रास असह्य झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी २० मार्चला उड्डाणपूल खुला केला होता. पण श्रेयाची खिरापत खाण्यासाठी  सरकारी रेट्यामुळे प्रशासनाने पुल पुन्हा बंद केला. वास्तविक उड्डाणपुल बंद असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वे फाटक बंद असल्यामुळे अनेक रूग्णांना  वेळेवर रूग्णालयात पोहचू न शकल्यामुळे प्राण गमवावे लागत आहेत. परंतु पालकमंत्र्यांना त्याची पर्वा नाही. केवळ श्रेयासाठी त्यांची सुरू असलेली केविलवाणी धडपड किळ्सवाणीच म्हणावी लागेल. जनतेच्या जिविताशी खेळण्याचा हा प्रकार आहे, असे मत भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी व्यक्त केले.

रेल्वे विभाग म्हणते .....
उड्डाणपूलाचे रेल्वे विभागाकडील बांधकाम १३  डिसेंबर २१ मध्येच पूर्ण झाले होते. तेव्हाच रेल्वेने बांधकाम विभागाला पत्र देवून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने उड्डाणपूलावरून वाहतूक सुरू करण्याबाबत सुचविले होते. मात्र तिन महिने लोटले तरी बांधकाम विभाग हातावर हात देवून बसलेला आहे  जनतेच्या जिवाशी खेळ्ण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल असेही भाजपाचे महामंत्री नागेश घोपे म्हणाले.
बॉक्स 
*बांधकाम विभागाचे काम पूर्ण*
भाजपाने सुरू केलेला पुसद मार्गावरील रेल्व उड्डाणपूल सुरू केल्या नंतर बांधकाम विभागाने पोलिसांना एक पत्र दिले. यामध्ये काम पूर्ण झाल्याची बाब खुद्द अधिकाऱ्यांनीच मान्य केली आहे. केवळ किरकोळ कामे शिल्लक असल्यामुळे उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याचे या विभागाचे म्हणने आहे. प्रत्यक्षात कुठलीच किरकोळ कामे उरली नसल्याचे नागेश घोपे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments