कधी नव्हे इतक्या आज घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय उष्णतेच्या लाटावर लाटा धडकताना दिसत आहेत . आघाडीकडून आणि भाजपतर्फे एकमेकांना आव्हाणे -- प्रतिआव्हाणे दिल्या जात आहेत . माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सवबळावरील एकहाती सत्ता आणू म्हणतात , तर दुसरीकडे आघाडीचे शिल्पकार शरद पवार युवा आमदारांना धीर देत सांगतात , " घाबरु नका , मी पुन्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येऊ देणार नाही ." हे दोघेही कसलेले व चाणाक्ष राजकारणी . या दोघांनाही कधी काय वक्तव्य करून वातावरण निमिर्ती कशी करायची हे चांगलेच ज्ञात आहे . परंतू आघाडीतील टोकाच्या भानगडी व अंतर्विरोध पाहता आणखी पुढे काय काय घडू शकते याचा भरपूर अंदाज यायला मदत होते . यामध्ये या सरकारच्या कर्त्या पुरुषाकडून १) वास्तविकता अमान्य करणे २) मतदारांना गृहीत धरणे , या दोन गोष्टींविषयी काही अलिखित नियम तयार केला की काय ? अशी शंका वाटू लागते. असे नसते तर एवढे गैर प्रकार घडूनही अनाठायी भाषेचा वापर झालाच नसता . मिळालेली सत्ता ओरबाडून घ्या हा एककलमी समान कार्यक्रम दिसून आला नसता . लैंगिक हिंसाचराचे समर्थन , भ्रष्टाचाराचे उदात्तीकरण , लोकापेक्षेविषयीची उदासीनता , डागाळलेल्या लोकांना अभय अशा कितीतरी गोष्टींचा कहर झाला नसता .
लोककल्याणकारी सरकारची संकल्पना असे जे काही अभिवचन सार्थकी ठरण्याची जी आकांक्षा होती ती पुर्णतः पुसल्या गेली . याबाबत याला अनुसरून विधासभेच्या चोवीस मतदार संघातील दहा टक्के मतदारांकडून सरकारविषयीच्या लोकभावनांचा कल आमच्या एका सॅम्पल सर्व्हेव्दारे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यातून सरकारविषयी असमाधानाचा सूर आढळून आला .
आघाडी सरकारच्या या असमाधानकारक कामगिरीचा पुरेपुर फायदा कॅडर बेस्ड असलेला पक्ष निर्विवादपणे उचलू शकतो . तसाही भाजपकडून २०२४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत स्वबळप्रेरित एकहाती सत्ताप्राप्तीचा निर्धार केलेला आहेच . पण यासाठी भाजपला सुध्दा नुसत्या स्वप्नरंजनात अडकून पडून जमणार नाही . त्यासाठी चोफेर पराकाष्ठेची आघाडी उघडावी लागणार आहे . ओढून -- ताणून भाजपला काठावरल्या बहुमतापर्यंत भलेही पोहचता येईल . परंतू एवढे त्यासाठी पुरेसं ठरणार नाही . आज भाजपला तशी मोलाची संधी आहे . ही संधी अधिक ठसठसीत करण्यासाठी खूप मेहनतही घ्यावी लागणार आहे . नुसती महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून भाबडी अपेक्षा ठेवता येणार नाही . सरकारच्या बेपर्वाई कामगिरीमुळे जे घटक दुखावले , दुरावलेले आहेत त्यांना जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक आपलेसे करणे अगत्याचे आहे . त्यासाठी काही प्रभावशाली सामाजिक संघटना व काही निर्णायक परीणामकर्ते घटक समूह यांना गंभीरपणे आपल्याशी जोडून घ्यावे लागणार आहे . कायम भाजपचा उपाहासहकरण्यात ज्यांना आसुरी आनंद वाटतो आहे , त्यांना गारद करण्यासाठी भाजपाला पावणेदोन शतकी बहुमताचा आकडा ( १७५ ) सहज मिळवता येऊ शकतो . यासाठी पक्षाच्या ग्रामीण भागातील नाराज कार्यकर्त्यांकडे सुध्दा विशेष लक्ष द्यावे लागणार आहे . यावेळेस नेहमीच्या पद्धतीने भाजप आक्रमक राहल्यास त्याला नुसत्या काठावरील बहुमतावर समाधान मानावे लागेल आणि आहे त्यापेक्षा लढाईचा पटविस्तार केला तर पावणेदोन शतकी असा उचांकी स्वरूपाचा बहुमताचा आकडा गाठणे शक्य होईल .सध्या भाजपसाठी परिस्थिती अनुकूल आहे , पण एवढ्यावर विसंबून राहून कदापी जमणार नाही .तर काय केले म्हणजे उचांकी बहुमत मिळवता येऊ शकेल आणि विरोधकांना निरूत्तर करता येईल याचाही विचार होणे क्रमप्राप्त होईल . मात्र वास्तवाधारीत काही बाबींना समजून घेता आले तरच. तसे लाभदायक ठरणारे वास्वाधारीत मुद्ये आजूबाजूलच विखुरलेले आहेत डोळसपणे त्याकडे बघण्याचे कष्ट घेतले तर पाउणेदोन शतकी बहमताच्या आकड्यापासून भाजपला दूर ठेवणे सहजासहजी कुणालाही शक्य होणार नाही .पण त्या दिशेने भाजपकडून वाटचाल झाली तर .
0 Comments