वाशिम दिनांक : ०९/०३/२०२२
पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील पडणा-या चोरी जबरी चोरी, दरोडेर आळा घालण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच सराईत गुन्हेगारावर नियंत्रण ठेवण्याकरीता वाशिम जिल्हयात नव्यानेच क्रिप्स हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
दिनांक २७/०२/२०२२ रोजी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे फिर्यादी यश अनिल सरकटे वाशिम यांनी फिर्याद दिली की अज्ञात इसमाने त्याला फोन करून फोटो शुट करण्याकरीता जावयाचे आहे असे सांगुन फिर्यादीस त्यांचे मोटर सायकल वर बसवुन रेल्वे स्टेशन परिसरात घेवून गेले व त्या ठिकाणी फिर्यादीचे डोळयात चटणी पावडर फेकून मारहाण करून फिर्यादीना १.७५,००००/- या डिजीटल फोटो कॅमेरा व एक मोबाईल किमत अंदाजे २०,०००/-या असा एकूण [१,९५,००००/-रूचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोस्टे वाशिम शहरला अप.क.९४९ / २०२२ कलम ३९४ भादवी दाखल करण्यात आला असून, सदर गुन्हयातील आरोपीचा शोधाशोध चालू असतांना मिळालेल्या गोपनीय माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक तयार करून अकोला येवून एक विधी संघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेवुन गुन्हयासंदर्भात विचारपुस केली असता त्याने त्यांचे दोन साथीदारा सह वाशिम येथे येवून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याच प्रमाणे विधी संघर्षग्रस्त बालकाच्या सांगण्यावरून होणगांव जि. बुलढाणा येथुन दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवून त्यांनी चोरून नेलेला मुद्देमाल एक कॅमेरा व एक मोबाईल व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकुण २,४५,००००/- रु चा मुददेमाल जप्त करून ताब्यात घेतला. सदरच्या विधी संघर्षग्रस्त बालकांना पोस्टे वाशिम शहर यांच्या ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोस्टे वाशिम शहर करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. भामरे साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे पथकातील सपोनि विजय जाधव, पोहेकॉ सुनिल पवार, पोना अमोल इंगोले, राजेश राठोड, अश्वीन जाधव, सायबर सेल येथील पोकों प्रशांत चौधरी गोपाल चौधरी यांनी केली आहे.
0 Comments