Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरीआत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखाची शासकीय मदत

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पोटी पारवा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी दयाराम शंकर गावडे यांनी दिनांक 29 10 2021 रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली असून सदर शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरण शासकीय मदतीसाठी मंजूर झाल्याने आज रोजी 18 मार्च 2022 रोजी शुक्रवारी प्रकरणातील मृतकाचे वारसदार रूक्‍मीनबाई दयाराम गावंडे रा. पोटी यांना मंगरूळपीर चे निवासी नायब तहसीलदार श्री रवि राठोड यांचे हस्ते 30 हजार रुपये रकमेचा धनादेश दिला असून उर्वरीत 70 हजार रुपये बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येईल असे यावेळी त्यांना सांगण्यात आले धनादेश देत असताना प्रसंगी शिंदे बाबू मंडळ अधिकारी तहसील कार्यालयाचे कर्मचारी हजर होते. शेतकरी परिवाराच्या कुटुंबातील महिलेस धनादेश देण्यात आला

Post a Comment

0 Comments