वाशिम पोलीस दलाचे वतिने पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता राबविण्यात येत असलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांमुळे सतत प्रेरणा मिळत असते. वाशिम पोलीस घटकामध्ये एकुण 1414 पोलीस अंगलदार व 99 पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. पोलीस अधिकारी व अंमलदार हे सतत 24x7 कर्तव्य बजावत असतात तसेच सण उत्सव, कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्ताकरीता सतत व्यस्त असतात.
दिनांक 17.03.2022 रोजी होळी दहन व दिनांक 18.03.2022 रोजी रंगपंचमी (धुलीवंदन)' या दोन्ही दिवशी पोलीस अधिकारी व अंमलदार हे बंदोबस्ताकरीता तैनात होते या सण उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाहीत तसेच शांततेत सण उत्सव साजरे झाले. त्याचाच एक भाग म्हणुन सर्वसामान्यांचा होळी व रंगपंचमी हा सण शांततेत पार पडल्यानंतर दिनांक 19.03.2022 रोजी सायंकाळी 18.30 वाजता मा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे करीता रंगपंचमी (धुलीवंदन) चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. • पोलीस दलातील अधिकारी अंगलदार आपल्या दैनंदिन कामाचा ताण तणाव दिसरून सर्व पोलीस बांधवांनी होळीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होवुन ऐकमेकांना रंग गुलाल लावुन होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांचे संकल्पनेतुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन यामुळे पोलीस दलातील अधिकारी व अमलदार यांचे मध्ये आनंदाचे वातावरण दिसुन आले. या कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांनी पोलीस अधिकारी अंमलदार यांना रंग लावुन होळी या सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांचे साठी अल्पोहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाकरीता मा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS), सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी (IPS), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिलकुमार पुजारी, प्रभारी पोलीस उप अधीक्षक श्री ब्रम्हदेव शेळके, पोनि श्री सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा पोनि श्री रफीक शेख ठाणेदार वाशिम शहर पोनि श्री धंनजय जगदाळे शवाशा, पोनि श्री उदय सोयस्कर जिवाशा, पोनि घृवास बावणकर, रापोनि मांगीलाल पवार, सपोनि विनोद झळके ठाणेदार वाशिम ग्रामीण व इतर पोलीस अधिकारी असे एकुण 20 अधिकारी व 110 पोलीस अंमलदार कार्यक्रमासाठी हजर होते.
0 Comments