अनेक वर्षापासून समाज हितासाठी कार्य करणाऱ्या यंग सिटीझन टीम च्या माध्यमातून वृक्षांसाठी जल सेवा या उपक्रमा अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले उद्यानातील प्रशासनाच्या चुकीमुळे सुकत असलेल्या वृक्षांना पाणी देऊन पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली. पर्यावरणपूरक होळीची गोडवे सगळेच गातात. त्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे, लाकूड न जाळणे, नैसर्गिक रंग लावणे इत्यादी बाबी अंतर्भूत असतात. या ऐवजी पर्याय उपलब्ध कोणी करुन देत नाही. या निमित्ताने पाण्याचा सदुपयोग सांगणारा एक उपक्रम यंग सिटीझन टीमने, मंगरुळपीर येथे राबविला आहे. या होळीपासून सार्वजनिक ठिकाणच्या लावण्यात आलेल्या वृक्षांना पाणी उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी या टीम ने घेतली आहे.
आज धुलीवंदनाच्या निमित्ताने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले या नियोजित उद्यानात पाण्याचे टॅंकर बोलावून झाडांना पाणी घातले. नियमितपणे श्रमदान करुन परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या यंग सिटीझन चा पर्यावरण पूरक उपक्रम अनुकरणीय आहे. यासाठी मंगरुळपीर शहर वासियांनी पुढे येवून सहकार्य करण्याची गरज आहे.
या प्रसंगी नैसर्गिक रंग लावून रंगोत्सव देखील साजरा करण्यात आला. नेहमीप्रमाणे राष्ट्रगीताने आजच्या उपक्रमाची सांगता झाली. तुकाराम महाराजांनी म्हटले होते वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
वृक्ष ही काळाची गरज आहे त्यातच आजच्या काळामध्ये जंगलाला लागलेल्या आगी, जंगलातील वृक्षतोड, विकासात्मक कामामुळे करण्यात आलेल्या वृक्षतोडी यामुळे वृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. जर वृक्षच नसतील तर मानवाला श्वास कुठून घेता येईल, प्राण्यांना जगत कसा येईल या सर्व बाबी लक्षात घेऊन यंग सिटीझन अंतर्गत वृक्षांसाठी जलसेवा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. असे मत यंग सिटीझन चे संस्थापक अध्यक्ष सुचित देशमुख यांनी सांगितलं
या कार्यक्रमा प्रसंगी कल्याणी पाटील, आरती चव्हाण, सूचित देशमुख, सागर गुल्हाने, समरजित रघुवंशी, विशाल शिंदे, ओम फुके, श्रीजीत देशमुख, किरण चंद्रशेखर, सोहम पाटील, आदित्य राऊत, वैष्णवी इंगोले, सुमेध पजई, चंद्रशेखर ढोले, निलेश तुळजापूर, अविनाश सावके, अविनाश चव्हाण, प्रकाश मुंढरे, अशोक राऊत आदी सदस्यांची उपस्थिती होती. यंग सिटीजन टीमचे मनापासून कौतुक करण्यासाठी ध्यास फाऊंडेशनच्या संचालिका समाजसेविका अश्विनीताई अवताडे प्रामुख्याने उपस्थित होत्या
0 Comments