Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

मंगरूळपीर तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करण्यात आले
 कार्यक्रमाचे अध्यक्ष शितलताई बंनगर तहसीलदार मंगरुळपिर ,
कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक . 
प्रा.सुधीर घोडचर अशासकिय सदस्य, महाराष्ट्र, राज्य ग्राहक परिषद मुंबई.  माजी नगराध्यक्ष प्रा. ज्येष्ठ पत्रकार वीरेंद्र सिंह ठाकुर , कु रूपालीताई सोळंके निरीक्षण अधिकारी
नितीन विटकरे,  नितीन बंग , नगरपालिकेचे शिंदे, वीज वितरण कंपनीचे जांभुळकर साहेब यांचे प्रतिनिधी,पत्रकार संतोष चव्हाण ,अशोक राऊत ,विनोद डेरे, फुलचंद भगत, रमेश भाऊ मुंजे वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी,मंगरूळपीर येथील तहसील सभागृहात जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात आला 
ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि  बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी विविध संघटना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करतात. यासाठीच 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.  (15 मार्चला) जगभरात साजरा होणाऱ्या या दिनाचे महत्व जाणून घेत असताना कार्यक्रमाच्या प्रसंगी मंगरूळपीर येथील तहसीलदार शितलताई बंनगर अध्यक्ष  भाषणात  ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा, निवडीचा आणि प्रतिनिधित्व चार हक्क  त्यानंतरच्या कालावधीत ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा आणि पाठपुरावा करून मुलभूत गरज पुरविण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखी चार ग्राहक हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. वस्तूची ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे गरजेचे आहे. 
ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी :

फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
वस्तू खरेदी करताना एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नका.
वस्तू खरेदी करताना बिल मागावे.
सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या.
डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.
वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा.
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा नंतरच पेट्रोल भरा.
ऑनलाईन खरेदी करताना सजग राहा.
वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या. अशा अनेक महत्त्वाच्या माहितीवर प्रकाश टाकण्यात आला
कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक . 
प्रा.सुधीर घोडचर अशासकिय सदस्य, महाराष्ट्र, राज्य ग्राहक परिषद मुंबई.  माजी नगराध्यक्ष प्रा. ज्येष्ठ पत्रकार वीरेंद्र सिंह ठाकुर , कु रूपालीताई सोळंके निरीक्षण अधिकारी इत्यादी मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले
या कार्यक्रमासाठी स्वस्त  दुकानदार ,पेट्रोल पंप संचालक ,शहरातील व्यापारी, ई-सेवा केंद्राचे प्रतिनिधी, शहरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन निलेश पाटील स्वस्त धान्य दुकानदार यांनी तर आभार प्रदर्शन अन्नपुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षक कु सीमा दोनदल  यांनी केले

Post a Comment

0 Comments