Ticker

6/recent/ticker-posts

युद्धामुळे खत होऊ शकतो महाग,

 सुधाकर चौधरी वाशिम खबर संपादक
वाशिम : शेतकऱ्यांच्या चिंतेत भर लग्नसराईच्या सीजनमध्ये  खताच्या नावावर पुन्हा शेतकरी लुटल्या जाण्याची शक्यता ? रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे खतनिर्मितीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या आयातीवर परिणाम झाला असून, त्यामुळे खतांचे दर आकाशाला गवसणी घालतील, अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच आवश्यक खतांचा साठा करून ठेवणे योग्य ठरेल, असे सांगितले जात आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला आता जवळपास बावीस दिवस होत किमती गगनाला पोहोचले आहे. युद्धामुळे आधीच खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

आता त्याचे पडसाद कृषी क्षेत्रावरही उमटू लागले आहेत. खतांच्या किमती वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रशिया आणि बेलारुसमधून आवश्यक खतांपैकी १५ टक्के खते आयात केली जातात.

मात्र, रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्याने रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियावर निर्बंध कायम राहिले तर  खतांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे. शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न करता आपला बजेट निश्चित करून घ्यावा जर शेतकरी बांधवांना वाटत असेल आपली कोणी लूट करत आहे. तर त्यांनी निश्चितच कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करावा राज्य सरकारने शेतकऱ्याचा आर्थिक बजेटचा विचार करून होत असलेल्या महागाईवर आळा घालण्याचा प्रयत्न करावा महागाई बद्दल अशी शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments