Ticker

6/recent/ticker-posts

एक दिवशीय पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

कारंजा लाड-स्थानिक गुरुदेव सेवा आश्रम येथे संपन्न झाली यावरी विचारपीठावर बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील राज्य सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार एडवोकेट सुधाकर खुमकर पुण्यनगरीचे अकोला जिल्हा प्रतिनिधी अनिल माहोरे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव पत्रकार संघाचे जिल्हा प्रभारी बंडूभाऊ इंगोले यांची उपस्थिती होती यावेळी यावेळी बहुजन पत्रकार संघ ज्या विचारधारेवर चालतो ते महापुरुष छत्रपती शिवराय महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक राहुल जाधव यांनी मनोगत व्यक्त करून कार्यशाळेचे उद्घाटन केले व बहुजन पत्रकार संघाच्या सर्व सभासदांना प्रशासकीय मदत करण्याचे आश्वासन दिले.
 यावेळी बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम  आवारे पाटील यांनी आपल्या पहिल्या सत्रात पत्रकारिता आणि पत्रकार या पुढील आव्हाने बातमी तंत्र बहुजन पत्रकारांची महाराष्ट्राला गरज आदी विषयावर सखोल मांडणी करून करंजा बहुजन पत्रकार संघाचे सभासदांना मार्गदर्शन केले 
एड. सुधाकर खुमकर यांनी क्राइम पत्रकारिता क्राईम बातम्या पत्रकारांनी साठी असलेला संरक्षण कायदा पत्रकारांवरील असलेली आव्हाने पत्रकारांची आज असलेली अवस्था आधी विषयावर सखोल मांडणी करून चिंतन करणारे मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष धोंगडे धोंगडे यांनी तरा प्रास्ताविक एकनाथ पवार यांनी केले कार्यक्रमाचे आभार तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे यांनी मानले. समारोपीय सत्रामध्ये बहुजन पत्रकार संघाच्या अध्यक्ष आरीफ पोपटे , उपाध्यक्ष एकनाथ पवार ,सचिव गणेश बागडे संघटक अशिष धोगळे, कोषाध्यक्ष प्राध्यापक शेकुवाले कार्याध्यक्ष दादाराव बहुटे ,सहसचिव मोहम्मद मुन्नीवाले ,रामदास मिसाळ जक्का खान ,प्रभाकर सोमकुवर विनोद नंदागवळी ,कालूभाई तवगड, उषा नाईक, मयुरी गुप्ता, महेंद्र गुप्ता, दिगंबर सोनवणे ,पवन कदम ,संकेत वांवगे ,महादेव कोठडे ,राजेश वानखेडे राहुल गावडे, राजेश भगत ,हरदीप पिंजरकर ,रमेश देशमुख ,मयूर राऊत, संतोष दगडे, जिंवर तायडे ,मतीन खान, गालीफ पटेल, संदीप कुर्हे, हेमंत पापडे, राजेंद्र शामसुंदर ,रमेश वानखडे, विलास खपली, संजय लोखंडे, विलास इंगळे ,शेषराव वरठी,अब्दुल अलिम, शेख हकीम ,अनुप पाठे आदिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Post a Comment

0 Comments