मा. पोलीस अधिक्षक सा. वाशिम यांचे संकल्येनेतुन पोलीसांकडुन नागरिकांना देण्यात येणा-या सेवा विषयी व राबविण्यात येणा-या उपक्रमाबाबत माहिती देण्याचे तसेच नागरिकांना पोलीसांकडुन अपेक्षा व पोलीसिंग बाबत त्यांचे मत जाणुन घेण्याचे उददेशाने दि.०९/०३/ २०२२ रोजी महेश भवन कारंजा येथे "पोलीस व नागरिक सुसंवाद" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाशिम पोलीस दलामार्फत १. निर्भया पथक, २. डायल ११२, ३.दुष्टी, ४. क्रिप्स, ५. वाहतुक नियमन, ६. सायबर सेल, ७. सेवा अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर उपक्रमाची माहिती जनसामान्या पर्यंत पोहचविण्या करिता सदर कार्यक्रमाचे आयोजन करून सदर कार्यक्रमास कारंजा शहरातील सेवाभावी संस्था, महाविद्यालयाचे सदस्य, पोलीस मित्र, व्यापारी असोशिएशन चे सदस्य, जेष्ठ नागरिक सदस्य, शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी, समाजसेवा करण्या-या महिला सदस्या तसेच समाजातील प्रतिष्ठीत नागरिक यांचे सोबत संवाद साधण्यात आला. व त्यांना वर नमुद उपक्रमा बाबतची सविस्तर माहिती मिळावी या उददेशाने माहिती पत्रके उपस्थितांना वितरित करण्यात आली.
सदर कार्यक्रमास उपस्थित नागरिकांकडुन त्यांचे मत जाणुन घेतले असता, नागरिकांनी प्रामुख्याने कारंजा शहराच्या काही भागात वाहतुक नियमाविषयी समस्या मांडल्या. तसेच शालेय मुली व महिला यांचे मध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे बाबत मते मांडली. सदर समस्यांचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधिक्षक यांनी कारंजा शहरात वेगळी वाहतुक शाखा निर्माण करण्या बाबतचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच महिलाचे सुरक्षेला प्राधान्य देवुन निर्भया पथकामार्फत वर्दळीचे व निर्जन ठिकाणी प्रभावी पेट्रोलिंग करण्या संबंधाने तसेच महिलांना कायदयाचे ज्ञान अवगत होण्याचे दुष्टीने शाळा महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्या संबंधाने ठाणेदारांना सुचना दिल्या. तसेच कारंजा शहराचा मागिल काही वर्षांचा इतिहास पाहता कारंजा शहर हे संवेदनशिल असल्याने पोलीस प्रशासनाकडुन कायदयाची कडक अंमलबजावणी करणे हे पोलीस दलास बंधनकारक असल्याचे प्रामुख्याने मा. अधिक्षक यांनी नमुद केले. पोलीस
सदर कार्यक्रम श्री. बच्चन सिंग, पोलीस अधिक्षक, वाशिम यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला असुन सदर कार्यक्रमा करिता कारंजा शहरातील ४० ते ४५ विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जगदीश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा यांनी केले असुन आभार प्रदर्शन ठाणेदार श्री. आधारसिंग सोनोने यांनी केले.
0 Comments