Ticker

6/recent/ticker-posts

प्रभागरचना रद्द : ऑक्टोबरपर्यंत प्रशासक राज कायम राहणार नगर परिषद निवडणूक लांबणीवर;

वाशिम: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकहाती विजय कसा मिळवायचा, मतदारांना स्वतःकडे कसे आकर्षित करायचे, विरोधकांना धोबीपछाड कशी द्यायची, या सर्व बाबींचा सखोल अभ्यास असलेल्या काही प्रस्थापितांनी आगामी न. प. आहे. निवडणुकीतील विजयश्रीवर डोळा ठेवून त्या पद्धतीने जय्यत तयारी सुरु केली होती. मात्र, प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर ७ मार्च रोजी विधानसभेत मंजूर झालेल्या दोन विधेयकांमुळे न. प. निवडणूक लांबणीवर पडली असून, अनेकांच्या मनसुव्यांवर पाणी फेरले आहे. जिल्ह्यातील चारही नगर परिषद क्षेत्रात यामुळे जोशात असलेल्या इच्छुकांचे चेहरेही हिरमुसले आहेत.

जिल्ह्यात वाशिम, कारंजा, रिसोड आणि मंगरुळपीर अशा नगर परिषदा कार्यान्वित आहेत. त्यापैकी रिसोड वगळता इतर तीन नगर परिषदांचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात आला. तेव्हापासून तीनही • ठिकाणी शहर विकासाचा


प्रशासकांकडून हाकला जात आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील ओबीसी आरक्षणासंबंधीचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणूक होऊ घातलेल्या न. प. क्षेत्रातील प्रभागांच्या हद्दी निश्चित करणे, प्रभागनिहाय भौगोलिक सीमा निश्चित करून हरकती आणि सूचनांची प्रक्रिया पूर्ण  करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार, प्रशासनाने चारही न. प. क्षेत्रात प्रारूप प्रभागरचना जाहीर केली. मात्र, नागरिकांकडून या प्रभागरचनेवर हरकती आणि आक्षेप घेण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी  डेटा गोळा करण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी दोन विधेयके विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आली.
सोबतच जाहीर झालेली
प्रभागरचनाही रद्द करून सरकारच्या
अधिकारात नव्याने प्रभागरचना केली जाईल, असे ठरविण्यात आले. यामुळे एप्रिल, मे या महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे  गेल्या. या घडामोडींमुळे अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.

Post a Comment

0 Comments