मंगरूळपीर येथे जिल्हा परिषद प्रांगणा मध्ये येऊन बसा अन् पोटभर हसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्व. हंसराजजी व्यास, स्व. पंढरीनाथ ठाकरे, स्व. सूनिताताई बेंद्रे यांच्या स्मृती प्रित्यर्थ व गानसम्राज्ञी स्व. लतादीदी मंगेशकर, आईसाहेब ठाकरे, स्व. पंचफुलाबाई राऊत, स्व.अरविंद भोंडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
सार्वजनिक होलीकोत्सव समिती व अंकुर साहित्य संघ राम ठाकरे मित्र मंडळ शिवराज मित्र मंडळ, शिवरत्न मित्र मंडळ, सर्वधर्म मित्र मंडळ मंगरुळपीर यांचे विद्यमाने विना तिकीट, विना पास मात्र कार्यक्रम एकदम झकास दोन तास सतत खळखळून हसवणारे तुफान हास्य विनोद करणारे अँड अनंत खेडकर, हिम्मत ढाळे, गजानन मते, अचलपूर, कवियत्री गुंजन पाटील, जळगांव यांनी श्रोत्यांना हसविले .हास्य सम्राट प्रा संजय कावरे तसेच बच्चे कंपनी चा आवडता छोटू बॉस जावेद मलकापूर बचे कंपनी मोठ्या संख्येने उपस्थित होती येऊन बसा अन पोटभर हसा २०२२ या हास्य कवि संमेलनाचे उद्घाटन सुभाषराव ठाकरे माजी राज्यमंत्री यांनी केले तर राम ठाकरे यांनी पर्यावरण पूरक केर कचन्याची होळी पेटविली या वेळी हरिष महाकाळ, चंद्रकांत पाकघने दौलत इंगोले, राजेंद्र मिसाळ, अनिल गावंडे, संजय मिसाळ, मोहनसिंह ठाकूर, तानाजी आंबेकर, नारायण बारड, बाळासाहेब पाटील, राम ठाकरे, सुधिर बेंद्रे, गिरीषकुमार बाहेती, उमेश गावंडे, संजय भोयर, सुनिल किरसान आशिष खोडके, ग्राम घोटा या छोट्याशा खेडे गावातुन पी. एस. आय करीता पात्र ठरलेल्या धम्मानंद विजय इंगोले यांचा सत्कार करण्यात आला. गानसम्राज्ञी भारतरत्न स्व. लतादिदी मंगेशकर यांना भावपूर्ण
श्रद्धांजली सादरकर्ते डॉक्टर प्रा. सजिव इंगळे, कु. पोर्णिमा इंगळे, सचिन धुर्वे व संच यांच्या वतीने गित गायनाने वाहण्यात आली. तर कार्यक्रमासाठी दिलीप आंबेकर (प्राचार्य ) दिपक राऊत, सचिन उर्फ बाळा मांढरे, आनंद राऊत, राहूल रघुवंशी कु. आश्लेषा भारसाखळे, भक्ती परळीकर आदींनी परिश्रम घेतले तर राम ठाकरे मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ, शिव रत्न मित्र मंडळ सर्वधर्म मित्र मंडळ यांच्या आवाहनावरून सर्वच जाती धर्माच्या पुरुष व महिलांसह मुला मुलीनी हास्यविनोद त्याचा आनंद लुटला येऊन बसा आणि पोटभर हसा मंगरुळपीर तालुक्यातील व परिसरातील सर्व जनसमुदाय खदखदून हसला
0 Comments