वाशिम : उत्तर प्रदेश,उत्तराखंड, गोवा व मनिपूर या चार राज्याच्या आज (दि.10) लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालात भारतीय जनता पार्टीने मिळविलेल्या घवघवीत विजयाचा वाशिम शहरात जल्लोष करण्यात आला. स्थानिक शिवाजी महाराज चौक व पाटणी चौकात गुलाल व फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत ढोल ताशांच्या निनादावर कार्यकर्ते थिरकले.तर यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
उत्तर प्रदेश,उत्तराखंड, गोवा, पंजाब व मनिपुर या चार राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा आज निकाल लागला. सदर निकालात पाच पैकी चार राज्यात भारतीय जनता पार्टीने भरघोष यश मिळविले. भाजपाच्या देशभरातील कार्यकर्त्यांनी या निकालानंतर जल्लोष साजरा केला.
वाशिम शहरही याला अपवाद नव्हते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व पाटणी चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. गुलालासह पुष्पांची उधळण करीत कार्यकर्ते ढोल ताशांच्या निनादावर थिरकतांना दिसून आले.यावेळी जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे, माजी आमदार पुरूषोत्तम राजगुरू,जिल्हा कोषाध्यक्ष मिठूलाल शर्मा, नगर परिषदेचे उपाध्यक्ष बापूभैय्या ठाकुर, ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळू मुरकुटे, शहर सरचिटणीस गणेश खंडाळकर, सुनिल तापडिया, जिल्हा संपर्क प्रमुख धनंजय रणखांब,तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे, शहर उपाध्यक्ष रामेश्वर ठेंगडे,भिमसेठ जिवनानी, रूपेश वाघमारे, सोशल मिडियाचे जिल्हा संयोजक नविन शर्मा,उत्तमराव पोटफोडे, कैलास मुगणकर, विराज पाटील, करूणाताई कल्ले, रूपाली देशमुख, अंजली पाठक, छायाताई मडके, छायाताई पवार, नकलेताई, भावना सरनाईक, कपिल सारडा, जयेश आंबटपुरे, शंकर देशमुख, मदन राठी, रामा इंगळे, विश्वास ब्रम्हेकर, सुरज चौधरी,मोहन गांजरे, रामभाऊ भिसे, शंकर खंडारे,ऱ्राजु कलवार, आशुतोष निरखी, सचिन शर्मा, गिरीश शर्मा, महादेव लांभाडे, गणेश डाळ, बंटी सेठी, योगेश सराफ आदींसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
0 Comments