Ticker

6/recent/ticker-posts

कार्यकारी अभियंत्यासाहित वरिष्ठ लिपिक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात


अमरावती :-  तकारदार यांचे मामा हे शासकिय कंत्राटदार असून त्यांनी केलेल्या २ कामा पैकी झालेल्या एका कामाचे बिल काढुन दिल्याचे मोबदल्यात श्री कळसकर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक (आदिवासी विभाग, अमरावती हे ५०,०००/- रुपये तसेच लिपीक श्री गुडधे हे १०,०००/ रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत दिनांक ११.०३.२०२२ रोजी तकार acb ला  प्राप्त झाली. ●

सदर करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान तक्रारदार यांचे मामा यांनी पुर्ण केलेल्या कामाचे बिल मंजुर केल्याचा मोबदला म्हणून कार्यकारी अभियंता श्री कळमकर यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रुपये तसेच लिपीक श्री गुढधे यांनी वरिष्ठाकडे बिल सादर केल्याचा मोबदला म्हणून ५,०००/- रुपये लाचेची मागणी करून स्विकारणार असल्याचे निष्पन्न झाले.


 त्यानंतर कार्यालय कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी विभाग) , अमरावती येथे आयोजित सापळा कार्यवाही दरम्यान श्री कळमकर कार्यकारी अभियंता, वर्ग१ यांनी त्यांचे दालनामध्ये तकारदार यांचे मामाकडून लाचेची रक्कम रुपये ५०,०००/- स्विकारले व लिपीक श्री गुडधे यांनी सुध्दा तकारदार यांचे मामाकडून ५,०००/- रुपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नमुद्र आरोपीविरुध्द पो.स्टे. फेजरपुरा, अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे

सदर ची  कार्यवाही *मार्गदर्शन* –
▶मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती. –  यामध्ये कारवाई पथक 
पोना/ सुनिल वर्‍हाडे, युवराज राठोड व अभय वाघ, चंद्रकात जनबंधू,.ला.प्र.वि.अमरावती.


Post a Comment

0 Comments