Ticker

6/recent/ticker-posts

खाजगीकरणाचे विरोधात म.रा.विज युनियन च्या माध्यमातून निषेध व्यक्त करत दिल्या घोषणा, आंदोलन उभारले जाणार

वाशिम
🇮🇳 म.रा.विज कर्मचारी,अभियंते, अधिकारी संघर्ष समिती व कंत्राटी कामगार संघटना कृती समितीचे , आदेशानुसार वाशिम सर्कल व विभाग समोर दि. 28 व 29 रोजी खाजगीकरणाचे विरोधात होणार्या संपाची तयारी करणेकरीता व निषेध नोंदविण्याकरीता व्दारसभा घेण्यात आली.🏳️‍🌈 व्दारसभेचे संचालन कॉ.जी व्ही भारस्कर (सर्कल सचिव) MSEB वर्कर्स फेडरेशन यांनी तर आभार प्रदर्शन विनायक मुठाळ (विभागीय सचिव) तांत्रिक कामगार युनियन 5059 यांनी केले. � प्रास्ताविक भाषण मोहन वाघमारे म.रा.विज कामगार संघटना(1701) यांनी तर प्रसंगानुरूप व मार्गदर्शक भाषणे संदिप जयपूरकर व डि आर लादे ( सबॉर्डीनेट इंजिनिअर असोशियन) , मेहराज मिर्झा (सर्कल सचिव) तांत्रिक कामगार युनियन (5059), डि टी ठाकरे (एस ई ए) यांनी केले.🇧🇴 व्दारसभेला एन आर घुगे,रोमील घुले, आर.ओ.खंडागळे, व्ही पी चव्हाण,व्ही जे गायकवाड, आर एन कुंटे,आर के तिरके,एस बी शेळके,एस जी कुबडे,एस आर देशमुख, मनिष तट्टू, स्नेहल शेंडे, वैशाली भोंडे, आदिंची उपस्थिती होती. हमारी युनियन हमारी ताकत, म.रा.विज कर्मचारी अभियंते अधिकारी संघर्ष समितीचा विजय असो, खाजगीकरण करणार्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो , हर जोर जुलूम की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है आदी घोषणा देवून सभासदांनी परीसर दणाणून सोडला. � इन्कलाब जिंदाबाद 🇮🇳

Post a Comment

0 Comments