▶️ दिपक सदाफळे (जिवरक्षक) पिंजर यांची जिगरबाजी दुस-या माळयावर चढुन केले रेस्क्यु ऑपरेशन
▶️ अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे (जिवरक्षक) आणी त्यांचे सहकारी कीशु तायडे,गोविंदा ढोके, यांनी मोठे धाडस करुन 14 मार्च रोजी रात्री तीन आगेमोह काढुन पुर्णपणे परीसर सुरक्षित केला यामुळे चिखलीसह मंदीरात ये-जा करणा-यांनी सुटकेचा श्वास सोडला
▶️ शेलुबाजार लगतच्या मंगरूळपीर तालुक्यातील चिखली येथील झोलेबाबा मंदीर आवारातील सभा मंडपाच्या बिल्डींगला दुस-या मजल्यावर लागलेल्या तीन आगेमोह एक दीड महिन्यापासुन लागले होते.तेव्हा पासुन या आगेमोहावरील मधमाशांनी ये-जा करणा-यांवर मधमाशांनी दोनतीन वेळा हल्ला चढविला.यात आतापर्यंत दहा-बाराजण जखमी झाले होते यातील तीन जनांना तर रुग्णालयात भरती केले होते.या पुढील एखादी मोठी दुर्घटना होऊनये म्हणून दखल घेत झोलेबाबा मंदीर संस्थानचे सचिव श्रीरामजी मांगुळकर यांनी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करण्यासाठी पाचारण केले.लगेच आज 14 मार्च रोजी सायंकाळी दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी यांनी रेस्क्यु साहीत्यासह घटनास्थळी येऊन सुरक्षितपणे तीनही आगेमोह काढुन टाकले यामुळे चिखलीसह येणा-या भाविकभक्तांना भयमुक्त केले यावेळी देवस्थान चे पदाधिकारी पत्रकार पवन राठी आणी रुग्णसेवागृपचे शिवा सावके उपस्थित होते यावेळी मंदिर समितीने जिवरक्षक दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी कीशु तेरे,गोविंदा ढोके यांचा शाल आणी श्रीफळ देऊन सत्कार केला अशी माहिती रुग्णसेवागृपचे शिवा सावके यांनी दीली आहे.
0 Comments