- कोव्हीड १९ च्या परिस्थितीमूळे शाळा बंद करण्यात आल्याने राज्यभरातील स्कुल बसेस बंद होत्या. यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्कुल बसेसचे २ वर्षाचे रोड टॅक्स माफ करण्याचा शासन निर्णय केला आहे.
याबाबत मेष्टाचे राज्य सहसचीव राहुलदेव मनवर यांनी शिष्टमंडळासह परिवहन मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री व खा.शरद पवार यांची भेट घेवून गेल्या २ वर्षाचे स्कुलचे बसचे रोड टॅक्स माफ करावे यासह ईतर मागण्यांचे निवेदन देवून त्यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर सदर निवेदनाबाबत खा.पवार यांचे खाजगी सचीव, मुख्यमंत्री कार्यालय, परिवहन मत्री, शिक्षण मंत्री व संबंधीत अधिकारी यांचेकडे पाठपुरावा केला. या निवेदनांवर संबंधीत सचीवालयाने राज्यातील स्कुलचे बसेसचे रोड टॅक्स माफ करण्याचा प्रस्ताव मंत्री अनील परब यांचेकडे ठेवला. त्यावर परब यांनी स्कुल बस वाहन धारकांना दिलासा देत अशा शाळा व शाळांचे विद्यार्थ्यांना ने- आण करून आपले कुटुंबाचे पालन पोषण करणार्या वाहन धारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सदर शासन निर्णयानुसार ज्या वाहन धारकांनी पुर्वीच रोड टॅक्स भरले आहे. अशा गाड्यांची सदर रक्कम पुढील काळासाठी ग्राह्य धरून पुढील वर्षाचे रोड टॅक्स भरावे लागणार नाही.
याकरीता महाराष्ट्र इंग्लीश स्कुलचे राज्य सहसचीव राहुलदेव मनवर, मराठवाडा ऊपाध्यक्ष संजयकुमार चव्हाण, जालना जिल्हा सचीव राजू तारे, कृष्णा पाबळे, विजय सतभाई यांचे सहकार्य लाभले आहे.
0 Comments