Ticker

6/recent/ticker-posts

समृद्धी महामार्गावरील उर्वरित शेतजमिनीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा-पुंजानी यांची मागणी

                                                                                                                           शासनाद्वारे  बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई द्रुतगती समृध्दी महामार्गाचे निर्माण करण्यात आले आहे.यामुळे निश्चिीतच विदर्भाच्या सर्वांगीण विकासामध्ये भर पडणार आहे, या महत्वपूर्ण प्रकल्पा साठी महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यामधील २२६ तालुक्यातील ३९२ गावाचा संबंध या समृध्दी महामार्गाशी येणार आहे. मा. बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई द्रुतगती समृध्दी महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या जमीनींचे संपादन करण्यात आलेले आहे, यामध्ये बहुसंख्या शेतक-यांच्या बागायत व जिरायती पेरणी योग्य शेत जमीनीच्या मध्यातुन नागपूर मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्ग गेलेला आहे त्यामुळे त्यांच्या जमीनीची मधोमध विभागणी होऊन त्याला उर्वरीत शेतजमीनीची वहिवाट करण्यासाठी समृध्दी महामार्ग मधून कोणत्याच प्रकारचा रस्ताही ठेवण्यात आलेला नाही. शेतजमीनी पेरणी करण्याकरीता व शेतीची काम करण्यासाठी शेतक-यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे समृध्दी महामार्गातील बहुसंख्य शेतक-यांच्या उर्वरीत शेतजमीन पडीत राहत आहे, त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणत आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच कोरोना जागतीक महामारी सारख्या भयंकर परिस्थिमध्ये शेक यांची अर्थिक स्थिती डबघाईस आलेली आहे, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे गरजेचे आहे, या करीता संबधित शेतक-यांना शेत जमीनीची वहिवाट करण्यासाठी त्यांना  योग्य प्रकारे रस्ता उपलब्ध करुन देण्यात यावा जेणेकरुन शेतक-यांना उदर निर्वाह करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन१२ जानेवारी रोजी  उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय कारंजा येथे  नायब तहसीलदार पाचारने यांना देण्यात आहे.यावेळी नगरसेवक जाकीर शेख,सै मुजाहिद,हमीद शेख, मो एहसान खान,शहबाज खान आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments