यंत्रणा अँक्शन मोडवर आली
असुन आता मंगरुळपीर नगरपरिषद कार्यालयात दररोज
प्रशासकिय कामानिमित्य येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनाही विना कोरोनाप्रतिबंधक लस न घेणारास तसेच विनामास्क असणारासही आता या कार्यालय प्रवेश मनाई करण्यात आली आहे. यामुळे आता लोक सतर्क होवुन कोरोनापासुन आपला बचाव करण्यासाठी फायदा होणार आहे व कोरोणा प्रतिबंधक लसिकरणाचा आकडाही वाढायला मदत होणार असल्याचे दिसते.मंगरूळपीर न.प.कडून सुरुवातीपासुनच कोरोणा सारख्या आजाराला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक ऊपाययोजनांवर भर देवून शहर कोरोनामुक्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आले. मुख्याधिकारी यांच्या सुचनेवरुन विविध ऊपाययोजना व जनजागृती करुन कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचाही वेग न.प. यंत्रणेने वाढविला.
आरोग्य व स्वच्छता विभाग प्रमुख राजेश संगत आणी त्यांच्या सहकार्यांनी लोकांमध्ये जनजागृती करून या महामारीला रोखण्यासाठी ऊपाययोजना केल्या. पुन्हा एकदा कोरोनाने मंगरुळपीर शहरात डोके वर काढल्याने प्रशासनाकडुन सतर्कता ठेवण्यात येत आहेत. आता मंगरूळपीर नगर परिषद कार्यालयात विनामास्क आणी विना व्हॅक्शिनेशन असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांना कार्यालयात प्रवेश मनाई करण्यात आली आहे.
न.प. प्रशासन आता अॅक्शन मोडवर आली असुन लोकांनीही प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या पथकामध्ये रमेश श्रृंगारे, कैलास टांक, डॉ. अजमल आणी त्यांचे आरोग्य पथक, आरोग्य निरिक्षक राजेश संगत आणी न.प. कर्मचारी यांचा या जनजागृती पथकामध्ये समावेश आहे. प्रत्येक प्रभागात जातीने लक्ष देऊन काम करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी इंगोले यांनी दिले
वाढता कोरोना व ओमिक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेता लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला नाही परंतू ज्यांना नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने लस न घेण्याचे प्रमाणित केले आहे. अशा व्यक्ती वगळून, ज्या व्यक्ती लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी पात्र आहे परंतू त्यांनी दुसरा डोस घेतला नाही अशा व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना कोविड विषाणूची बाधा झाल्यास किंवा असे व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन जास्त जोखमीच्या प्रवर्गात येत असल्यास त्यांना कोणतेही लक्षणे नसले तरीही त्यांना सुट न देता कोविड केअर सेंटर येथे सात दिवसासाठी थांबणे जिल्हाधिकाऱ्यांचे या आदेशाने बंधनकारक करण्यात आले आहे. काटेकोर नियमांचे पालन केल्यास कोरोना सारख्या आजाराल आपणच हद्दपार करू शकतो माझे कुटुंब माझी जबाबदारी
0 Comments