Ticker

6/recent/ticker-posts

पोषण आहारात अनियमितता नको..?युनिव्हर्सल क्रांति भूमि फाउंडेशनचे प्रमोद भगत संस्था उपाध्यक्ष /पत्रकार यांचे तहसीलदार यांना निवेदन.

मंगरुळपीर :  तालुक्यातील  विद्यार्थांना शालेय पोषण आहार  मिळत नसल्यामुळे युनिव्हर्सल क्रांती भूमी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रफुल इंगोले यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की, मागील मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून शाळा बंद आहेत त्यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यापासून बंद आहे पहिल्यांदा विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा कसा करायचा ? असा प्रश्न निर्माण झाला होता .दरम्यान या पोषण आहाराचा कच्चा माल गोदाममध्ये पडून होता त्याला कीड लागण्यास सुरवात झाली होती . या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना  गेल्या वर्षभऱ्यापासून त्यांच्या घरीच कच्चा आहार पुरविला जात होता.परंतु यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन  साधारणतः सहा महिन्यांचा काळ लोटला आहे . मे २०२१ नंतर आतापर्यंत विद्यार्थ्यांना हा आहार मिळू शकला नाही. दरम्यान आता शालेय पोषण आहाराच्या  साहित्या ऐवजी  विद्यार्थ्यांना रोख रक्कम देण्याचे नियोजनही सरकार कडून केले जात होते परंतु अद्याप राज्यातील जिल्हापरिषदाना याबाबत आदेश प्राप्त झालेले  नाहीत त्यामुळे आधीच कोरोनाचे  संकट त्यातही पालकांच्या हाती कामधंदा नाही त्यामूळे विद्यार्थ्यांनवर उपासमारीची वेळ आली आहे सबब कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा बंद असल्या तरी पूर्वीप्रमाणे  कच्चा आहाराचा   पुरवठा विद्यार्थ्यांनच्या घरपोच करावा. नाहीतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे जेणेकरून त्यांच्यावर आलेली उपासमारीची वेळ दूर करता येईल.असे  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष प्रा प्रफुल इंगोले,उपाध्यक्ष प्रमोद भगत ,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments