Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारणी गठीतविविध पदाधिकार्‍यांची अविरोध निवड


वाशिम - शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी अविरत लढणार्‍या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जिल्हास्तरीय बैठक मालेगाव येथील ना.ना. मुंदडा विद्यालयात नुकतीच घेण्यात आली. सदर बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली व सर्वानुमते जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात येवून विविध पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.
    बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष राजकुमार बोनकिले हे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यवाह विश्वनाथ सांगळे, प्राचार्य सुनिल राठी, पर्यवेक्षक दिनेश उंटवाल, दिनकर गुडदे, श्रीराम रोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मागील कार्यकारणीला ३ वर्ष पुर्ण झाल्यामुळे ही कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. त्याअनुषंगाने नविन कार्यकारणी झालेल्या बैठकीत सर्वानुमते विचार विमर्श करुन पुढील तीन वर्षासाठी जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये जिल्हाध्यक्षपदी कैलास बोरचाटे मालेगाव, जिल्हा कार्यवाहपदी अमोल काटेकर वाशिम, कोषाध्यक्षपदी विजय कट्यारमोल रिसोड, उपाध्यक्षपदी धनंजय पांडे रिसोड, सौ. सुचिता देशमुख वाशिम, सहकार्यवाहपदी सौ. ज्योती चिकटे मालेगाव, नरेश सुरळकर कारंजा, कार्यालयमंत्री म्हणून सुरेश लोखंडे मानोरा, संघटनमंत्री म्हणून जगदीश गायकवाड मालेगाव, महिला आघाडीप्रमुखपदी सौ. ममता भाटी वाशिम आदी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. उर्वरीत पदांची घोषणा पुढील बैठकीत करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.
    अध्यक्षीय मनोगतात राजकुमार बोनकिले यांनी परिषदेच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणार्‍या उपक्रमाबाबत माहिती दिली. यामध्ये आपल्या कार्यकर्तव्यातुन इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी कर्तव्यबोध दिवस साजरा करणे, आजादी का अमृत महोत्सव साजरा करणे आदी उपक्रमाबाबत बोनकिले यांनी माहिती दिली. झालेल्या बैठकीला राजेश संगवई, कैलास बोरचाटे, धनंजय पांडे, कैलास शिंदे, गजानन कुबडे, विजय कट्यारमोल, रामचंद्र वानखेडे, विनोद कांबळे, एस. एस. जोशी, महेश महल्ले, अनिल बळी, सौ. एम. एम. भाटी, सौ. ज्योती चिकटे, अश्विनी बैस, पी. बी. नव्हाळे, एच. डी. अढागळे, डी. पी. ताजणे, व्ही. एन. काळे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक विश्वनाथ सांगळे, संचालन अनिल बळी यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्निल जोशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments