वाशिम जिल्ह्यात व मंगरूळपीर, मानोरा ,कारंजा, मालेगाव ,रिसोड, तालुक्यासाठी संकटात सापडलेल्या तसेच मदतीची व संरक्षणाची गरज असलेल्या मुला-मुलींच्या मदतीसाठी असलेल्या चाइल्ड लाइन-१०९८ या हेल्पलाइनचे जिल्हा महिला व बाल विकास विभाग या क्रमांकावर, आलोक कग्रहरी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वाशिम.
बाल संरक्षण समिती, चाइल्ड लाइन आणि पोलिस या सर्व यंत्रणांनी एकत्रित येऊन समन्वय साधत असल्यामुळे लहान मुलांच्या संदर्भातील गुन्हे रोखण्यासाठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले.
लक्ष्मीताई काळे.जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वाशिम ,
अविनाश चौधरी जिल्हा समन्वयक चाईल्ड लाईन वाशिम,
लहान मुलांचे प्रश्न बिकट असून वाशिम जिल्हा व तालुक्या सारख्या भागात बाल भिक्षेकरी, बाल मजुरी, बाल लैंगिक शोषण, शारीरिक व लैंगिक अत्याचाराने पीडित मुले, शाळकरी तसेच वस्तीपातळीवरील मुलांसंदर्भात येणाऱ्या केसेस, त्याचप्रमाणे विधी संघर्षग्रस्त मुले, दुर्लक्षित मुले, रस्त्यावर रहाणारी मुले, घर सोडून पळून आलेली मुले अशा मुलांची प्रकरणे वाढत चालली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने नवी मुंबईत 'चाइल्ड लाइन-१०९८' ही हेल्पलाइन
चालविण्यासाठी युवा संस्थेची निवड केली आहे. मंगरूळपीर शहरातील समाजसेविका वनमाला पेंढारकर . संत गोरोबाकाका इं जिओ , समाजसेविका अश्विनीताई अवताडे. ध्यास फाउंडशन जिव्हाळा एनजीओच्या संचालिका, समाजसेवक इरफान शेख , वाशिम खबर आज महाराष्ट्राचे संपादक, व कर्मयोगी बापुरावजी चौधरी एनजीओचे सचिव सुधाकर चौधरी यांच्या भेटीदरम्यान झालेल्या संवादातून अनेक मुद्दे समोर आले या निमित्ताने वाशिम जिल्ह्यातील मुलांच्या संरक्षणाचे मुद्दे, तसेच त्यासंदर्भातील भूमिका व आव्हाने या संदर्भात चर्चा करण्यात आली पालात वस्तीत व अनाथ मुलांना या माध्यमातून भेट देण्यात आली. वाशिम जिल्हा बाल संरक्षण कक्षांतर्गत गावागावात बाल संरक्षण समिती स्थापन झाल्यामुळे लहान मुलांसदर्भातील केसेस आता जास्त प्रमाणात बाहेर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता शहरी भागातदेखील बाल संरक्षण समिती काम करत आहे . त्यांनी सांगितले. यावेळी वाशिम जिल्ह्याची भूमिका स्पष्ट करताना लक्ष्मीताई काळे.जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वाशिम ,अविनाश चौधरी जिल्हा समन्वयक चाईल्ड लाईन वाशिम, ,यांनी बाल कल्याण समितीची भूमिका स्पष्ट करतानाच बाल कल्याण समितीचे कामकाज कशा पद्धतीने चालते, याची माहिती दिली. तसेच, अविनाश चौधरी व काळे मॅडम यांनी मंगरुळपीर शहरातील बस स्टॅन्ड पाठीमागील भागांमध्ये, नगरपरिषद शॉपिंग सेंटर परिसरातील भागात, अशोक नगर झोपडपट्टीतील भागात काही कुटुंबाच्या भेटी घेऊन बऱ्याच अडचणी असलेल्या कुटुंबांचे समाधान केले
काळे मॅडम यांनी पोलिसांना बालकांचे हक्क व त्यासंदर्भातील कायद्यांचे ट्रेनिंग नसल्यामुळे त्यांना या केसेस हाताळताना बऱ्याचवेळी अडचणी येतात. त्यामुळे चाइल्ड लाइन आणि पोलिस यंत्रणेने एकत्रित काम करत असल्यामुळे मुलांना योग्य न्याय मिळत आहे असे स्पष्ट केले. तसेच चाइल्ड लाइनने केवळ वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर ते या हद्दीत मर्यादित न रहाता, संपूर्ण मुंबई हद्दीसाठी ही हेल्पलाइन सुरू असल्याचेही सांगितले
0 Comments