Ticker

6/recent/ticker-posts

शाळा व महाविद्यालय सुरू करणे बाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिले निवेदन ,

मंगरूळपीर - दिनांक 13- 1- 2022 रोजी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी राम औताडे यांनी शाळा व महाविद्यालय सुरू करणे बाबत मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी मा. सखाराम मुळे साहेब ,कर्तव्यदक्ष तहसिलदार श्रीमती शितल बंडगर  यांच्यामार्फत , मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन दिले.   
 
या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले की,शासनाने शाळा कॉलेज बंद करण्याचा तो जीआर काढला तो कोणत्या ही विद्यार्थ्याला मान्य नाही आहे कारण की सगळ्या गोष्टी 50% क्षमतेने चालू आहे तर शाळा आणि कॉलेज का बंद, मागील दोन वर्षे झाले शाळा कॉलेज बंद आहे त्यामुळे मुलांच्या अभ्यासात खंड पडलेला आहे या कालावधीमध्ये मुलांचे शैक्षणिक भरून न निघणारे नुकसान झाले आहे. आता कुठे शाळा चालू झाल्या होत्या,  मुले अभ्यासात रमली होती पण शाळा बंद झाल्यामुळे आणि त्याला पर्याय ऑनलाईन शिक्षणाचा दिल्यामुळे मुले शैक्षणिकव मानसिक कमकुवत बनत आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय योग्य नाही आहे, त्यामुळे खूप विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जात आहेत.ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम वेळोवेळी प्रसारमाध्यमांनी जनतेसमोर मांडले 
आहे. 
दोन वर्षांची ही पोकळी भरून निघेल का. आणि खरंच कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे मग आजीवन मुलांचे शिक्षण बंद चालूच करणार का.....
पालकांनो लक्षात ठेवा जीव महत्वाचा आहे, आणि कदाचित मुलांना घरी बसवून आपण मुलांचा जीव वाचविण्यात कदाचित यशस्वी व्हालही, पण आपल्या पाल्याचे शिक्षण असेच बंद चालू राहले तर आपल्या पाल्याची बुद्धी विकसित न झाल्याने तो बुद्धीने अपंग झालेला आपल्याला चालेल का?

विचार करा.. सर्वात मोठी संपत्ती ही मुलांची शैक्षणिक संपत्ती आहे, आणि शिक्षणच बंद पडले तर येणाऱ्या पिढ्या आणि देश बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा...

लक्षात ठेवा जोपर्यंत पालक वर्ग डिमांड करणार नाही तोपर्यंत सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रति जागृत होणार नाही आहे. हक्क मागाल तरच मिळेल. स्वतःच्या मुलांसाठी जिथे पालकच जागृत नाही तिथे सरकार कसे जागे होणार, त्यामुळे आता पालकांनी एकत्र येऊन आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याकरिता योग्य निर्णय घेऊन लढा देणे आवश्यक झले आहे.....

त्यामुळे पालकांनी आता मन कठोर करून मुलांना शाळेत पाठवायलाच हवे जेणेकरून मुलांच्या भविष्याला कीड लागणार नाही. शिक्षण न घेतल्याने बुद्धीने अपंग झालेली पिढी 100 वर्ष जरी जगली तर ती पालकांच्या मनाला आनंद देणारी नक्कीच नसेल हे मात्र नक्की त्यामुळे पालकांनी आवर्जून विचार करावा.....
50% क्षमतेने जर थेटर, हॉटेल्स, कार्यालय, ट्रॅव्हल चालू राहत असतील तर शाळा आणि कॉलेज का बंद,एक दिवस आड करून शाळा चालू होत्या सगळे विद्यार्थी कोविडचे पालन करून शाळेत येत होते त्याचप्रमाणे शाळा चालू ठेवाव्या, शाळा-कॉलेज पूर्णत बंद न करता त्याच्यावर योग्य पर्याय काढून पुन्हा चालू करावे अशी विनंती केली आहे. यावेळी कॉलेज आणि शाळेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या, सीमा शृंगारे ,रोशनी वानखडे,पुजा काकडे ,वैष्णवी गायकवाड ,(बी. ए - यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय मंगरुळपीर) निकिता मनवर ,पल्लवी जाधव ( 11वी / 12 वी - जिल्हा परिषद महाविद्यालय मंगरुळपीर)

Post a Comment

0 Comments