Ticker

6/recent/ticker-posts

अन्नत्याग सत्याग्रह मंडपाला पुंजानी यांची भेट

प्रतिनिधी। कारंजा:-
कारंजा  तालुका अंतर्गत येणाऱ्या  लाडेगाव येथे ३ जानेवारी २०२०  पासून लाडेगांव येथील नागरिकांनी ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामात झालेल्या अनियमितता व गैरव्यवहाराबाबत मार्च २०२१ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारी संदर्भात जिल्हा परिषद वाशिम यांचेकडून चौकशी अहवाल सादर करण्याचे पत्र दिनांक २/९/२०२१  रोजी प्राप्त झाले.परंतु  ३  जानेवारी २०२२  पर्यंत पंचायत समितीने जिल्हा परिषद कडे आणि तक्रारकर्त्या कडे अहवाल सादर केला नाही अगदी वेळेवर चार सदस्यीय चौकशी समिती नेमून आंदोलन करतांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती पत्र दिले. पण आंदोलनकर्त्यांनी निव्वळ तोंडी आश्वासनावर किंवा लेखी आश्वासनावर समाधान न मानता अहवाल मिळाल्याशिवाय सत्याग्रह मागे घेण्यास नकार दिला.
या आंदोलनाला ६ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नेते  हाजी  मो युसूफ  पुंजाणी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन  अन्नत्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा केली.व जिल्हा परिषद अध्यक्ष त्याचबरोबर पंचायत समिती गटविकास अधिकारी कारंजा यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांना या प्रकरणात लक्ष देण्याबाबत सांगितले. यावेळी हाजी मो युसुफसेठ पुंजानी सह मो याकूब खान,नूरमोहम्मद अकबानी,जाकीर शेख,आमद भाई आदी सह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments