Ticker

6/recent/ticker-posts

जिजाऊ अभिवादनाने विघपदि नारीजोड अभियानाची सुरुवात !

        : --  राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून १२ जानेवारी २०२२ पासून लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड च्या वतीने  जिल्हास्तरीय " विघपदि नारीजोड अभियान "  ची सुरुवात करण्यात आली . विघपदि म्हणजे , विधवा , घटस्फोटित परित्यक्ता आणि दिव्यांग होत. 
         विघपदि स्त्रिउपेक्षा मुक्तीकरण अंतर्गत पंचसूत्री हाती घेण्यात आलेला पंचसूत्री कार्यक्रम असा ; शिक्षण , रोजगार , ठिकाणा , स्त्रिसुरक्षा आणि निरोगीपणा अशि पंचसूत्री असून शिक्षण मुद्यांतर्गत विघपदि महिलांच्या शिकणाऱ्या मुला -- मुलींसाठी असलेल्या स्वाधार योजनेचा लाभ तालुकास्तरावर सुध्दा मिळाला पाहिजे . रोजगार नुसार या स्त्रियांना मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्जप्रकरणासाठी जमानतदाराची ( गॅरंटरची ) अट शिथिल करण्यात यावी , बऱ्याच महिलांना स्वत: चे घर नसल्यामुळे  घरकुल योजनेत त्यांना विशेष प्राधान्य आवश्यक आहे , अशा स्वरूपाचा हा पंचसूत्री कार्यक्रम आहे . 
      मंगरूळपीर येथील परमहंस भगवंत माऊली सार्वजनिक वाचनालयामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला .  यावेळी मुख्य संयोजक गंगाधर कांबळे , संगीताताई आव्हाळे , वनमालाताई पेंढारकर , ज्योतीताई ठाकरे , पद्माताई मोहड , कौतुक डोंगरे यांनी विचार मांडले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरेश वानखेडे यांनी केले . यावेळी मीरा इंगळे , चंद्रकला चव्हाण , अर्चना पठाडे , रंजना चव्हाण , रत्नाबाई पाढेन , लक्ष्मीबाई बेंद्रे , इंदुबाई पाढेन , शांताबाई भगत , शितल इंगोले , मयुर भालेराव , ज्ञानेश्वर राठोड , नारायण आव्हाळे आदिंची उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments