(मंगरुळपीर दि.१५): मराठा सेवा संघ प्रणित वैचारिक तरुणांचे बलशाली संघटन अशी ओळख असलेल्या संभाजी ब्रिगेडची बैठक मंगरुळपीर येथील विश्रामगृह येथे दि.१५ रोजी पार पडली. या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, वाशिम (पूर्व) जिल्हाध्यक्ष डॉ.प्रशांत गावंडे, पदवीधर विभागीय अध्यक्ष प्रा.गोपाल वांडे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पठाण सर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश सुर्वे, वाशिम-मंगरुळपीर विधानसभा अध्यक्ष राहुल बलखंडे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोपाल गावंडे, नितेश पोहकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. संभाजी ब्रिगेडच्या विभागीय कोषाध्यक्षपदी गणेश गावंडे, वाशिम जिल्हा कार्याध्यक्षपदी रमेश मुंजे, जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश चिपडे, तालुका उपाध्यक्षपदी गोपाल नानोटे, तालुका सचिवपदी शुभम मनवर, तालुका कार्याध्यक्षपदी प्रेम भोयर, तालुका संघटकपदी श्रीकृष्ण भरदुक, कायदेविषयक सल्लागार पदी अॅड.शिरीष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली तसेच या बैठकीत "गाव तिथे शाखा" हा संकल्प करण्यात आला.
या बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु, तर आभार गणेश गावंडे यांनी मानले.
यावेळी बैठकीत व्यंगचित्रकार गणेश वानखडे, नितीन खंडारे,अॅड.बलराज शृंगारे,अनिल बोंबले, भागवत कासार, हरिओम भरदुक, जय कासार, सुरज भगत विशाल लांभाडे, पवन ढेंगळे, सागर उखळकर, मंगेश खंडारे, रामेश्वर डुकरे आदी उपस्थित होते.
0 Comments