Ticker

6/recent/ticker-posts

झोडगा ते वाघा फाटा रस्त्याची परवानगी तात्काळ द्यावी जि प सदस्या सुनिता कोठाडे यांची मागणी

मंगरुळपिर अकोला राष्ट्रीय महामार्ग क्र 161 

मंगरुळपिर दि 14 
मंगरुळपीर अकोला मंगरुळपिर राष्ट्रीय महामार्ग क्र 161 वरील झोडगा फाटा ते वाघा रस्त्याची प्रलंबित परवानगी तातडीने देण्यात यावी अशी मागणी जि प सदस्या सुनिता पांडुरंग कोठाडे यांनी विभागीय वनअधिकारी अकोला यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे 

 निवेदनात असे नमूद केले की, राष्ट्रीय महामार्ग १६१ वर
झोडगा फाटा ते वाघा दरम्यानचा रस्ता आपल्या विभागातील काटेपुर्णा उभयारण्यात येत असल्याने हा
रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता तयार करण्याकरिता आपल्याकडे अनेक महिन्यापासून
परवानगी मागितलेली आहे. परंतु अद्याप पर्यंत आपल्या विभागातून हि परवानगी देण्यात आलेली
असल्याने या ठिकाणचा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. आता पर्यंत रस्त्यामुळे अनेक अपघात
झालेले आहेत. शिवाय दररोज अकोला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना या रस्त्याहून प्रवास करणे कठीण
झालेले आहे. याच रस्त्यावरील वाशीम जिल्ह्यातील काटेपूर्णा उभयरण्यात येणाऱ्या रस्त्याला वाशीम
विभागाकडून परवानगी दिल्याने तो रस्ता बांधून पूर्ण झालेला आहे. परंतु आपल्या कडून अद्याप पर्यंत
परवानगीची कार्यवाही पूर्ण झालेली नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून आपल्या
प्रलंबित असलेली परवानगीची कार्यवाही येत्या २६ जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करून राष्ट्रीय महामार्ग
प्राधिकरणाला सुपूर्द करावी. अन्यथा येत्या २७ जानेवारी २०२२ रोजी आपल्या कार्यालयांत येऊन
लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल.अशी मागणी निवेदनात केली आहे

Post a Comment

0 Comments