वाशिम, दि. 14 : बाल कामगार व किशोरवयीन कामगार कायद्याअंतर्गत कार्यरत असलेल्या कृती दलाने आज 14 जानेवारी रोजी वाशिम येथील आस्थापनेवर धाड टाकून चार बाल कामगारांची मुक्तता केली. बाल कामगार या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी आज 14जानेवारी रोजी वाशिम येथे धाडसत्राचे आयोजन करण्यात आले होते. तपासणी दरम्यान सिघम बेकरी,वाशिम येथे चार बाल कामगार काम करीत असल्याचे कृती दलाला आढळून आले. कृती दलाने सदर बाल कामगारास मुक्त करुन संबंधित आस्थापनाधारक रमेश बनारसी मौर्या यांचे विरुध्द शहर पोलीस स्टेशन वाशिम येथे गुन्हा दाखल केला.
बाल कामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 सुधारणा 2016 अंतर्गत कोणत्याही आस्थापनेत बाल कामगार असल्यास त्याबाबत कोणताही नागरीक, पोलीस अधिकारी किंवा सरकारी कामगार अधिकारी तक्रार नोंदवू शकतो. या कायद्याचे उल्लंघन केल्यास काम करुन घेणाऱ्या विरुध्द कलम 14 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येते. तरी बाल कामगार या अनिष्ट प्रथेचे समुह उच्चाटन करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे व कोणीही बाल कामगार कामावर ठेवू नये. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी केले आहे.
धाड सत्राच्या यशस्वीतेसाठी सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांच्या मार्गदर्शनात दुकाने निरीक्षक विनोद जोशी, योगेश गोटे, सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, चाईल्ड लाईनचे सदस्य अविनाश चौधरी,DCPU युनिट चे वाघ, यांनी या कारवाईसाठी सहकार्य केले.
आपणास बाल कामगार आढल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता.माहीती देणाऱ्याचे नाव गुपीत ठेवण्यात येईल
*******
0 Comments