Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीर येथे प्रथमतःच स्पर्धा परिक्षा द्वारे बक्षीसांची लयलूट


आत्मभान अँकेडमी च्या वतीने  रविवार 9 जानेवारी रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा ( जनरल नॉलेज ) परिक्षा देऊन बक्षीस नगदी रोख रक्कम जिंकण्याची संधी व विजेत्यांना चषक आणी प्रमाणपत्र मिळणार आहे सर्व सहभागी स्पर्धाकांना सहभागिता प्रमाणपत्र मिळविण्याची संधी उपलब्ध आहे . वयोमर्यादा अ गटासाठी नाही कोणत्याही वयाची व्यकी  परिक्षा देऊन बक्षीस जिंकू शकते . तरी जास्तीत स्पर्धकांनी सहभागी होऊन बक्षीस जिंकावे असे आवाहन आत्मभान अँकेडमी चे संस्थापक अध्यक्ष  सुनिलभाऊ मालपाणी प्रा . अनिल मानेकर यांनी केले असून बक्षिस वितरण समारंभ स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्र माता जिजाऊ जयंती निमीत्त 12 जानेवारी बुधवारी होणार आहे . या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल भाऊ मालपाणी राहणार असुन कार्यक्रमाला मार्गदर्शन यशवंत केडगे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर यांचे लाभणार असुन प्रामुख्याने विनोद डेरे (समाजरत्न पुरस्कार प्राप्त पत्रकार ), कविता मालपाणी, राजस्थानी महिला मंडळ, अशोक भाऊ कांबळे , (सचीव डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्र मं . ) किरणताई सोनोने मुख्याध्यपक सिध्दार्थ विद्यालय मंगरुळपीर ) उपस्थित राहणार आहेत . तरी जास्तीत जास्त स्पर्धाकांनी सहभागी होऊन स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता माँ जिजाऊँ जयंती दिनी होणाऱ्या बक्षीस वितरणच्या कार्यक्रमास ही हजर राहण्याचे आवाहन आत्मभान अँकॅडमीचे प्रा अनिल मानेकर, प्रा ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले आहे .



Post a Comment

0 Comments