मंगरुळपीर दि.(१२): संभाजी ब्रिगेड, मंगरुळपीर तालुक्याच्या वतीने राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माँसाहेब जिजाऊंना अभिवादन करून अत्यंत साध्या पद्धतीने विश्रामगृह, मंगरुळपीर येथे ही जयंती साजरी करण्यात आली.यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु यांनी आपल्या मनोगतात जिजाऊंच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी कार्यक्रमात गोपाल नानोटे, प्रेम भोयर, हरीश भोयर, शैलेश आटपडकर, मंगेश खंडारे, अमोल सावळे आदी उपस्थित होते.
0 Comments