Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना संक्रमण संशयित मृत्यू पावलेल्या मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी

                                                          प्रतिनिधी। कारंजा                                                                              कारोना माहामारीमुळे सर्वसामान्य जनतेची अर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. कोरोना संक्रमणाचा महाराष्ट्रात दि.९ मार्च २०२० पासून प्रादुर्भाव झाल्यामुळे हजारो नागरीकांचा यामध्ये मृत्यु झालेला आहे. कारोना महामारीमुळे बहुसंख्य कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यामुळे त्याकुटुंबीया समोर उदर निर्वाहाचा गंभिर प्रश्न निर्माण झालेला आहे, अशा परिस्थितीत शासनाने कोरानामुळे मृत्यु पावलेल्या मृतकाच्या कुटुंबास रु ५०  हजार आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतेलेला आहे, परंतु या मदत योजने मधून बहुतांश कुटुंब वंचित राहीलेली आहे. ज्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यु झाला त्य व्यक्तीवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले, कारोना बाधित असल्याचा संशय म्हणून या  व्यक्तींना विलगीकरण करण्यात आले. तसेच ज्या संशयीत रुग्णांना गृह विलगीकरण करण्यात आले होते अशा  बहुसंख्य कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झालेला आहे व बाधित मृतकांचे अन्त्यसंस्कार सुध्दा कोरोना नियमावली नुसार करण्यात  आलेले आहेत, परंतु अशा प्रकारच्या मृतकाच्या परीवाराला अद्यापही अधिक मदत देण्यात आलेली नाही, म्हणून, कोरोनाबाधित संशयीतरित्या मृत्यु पावलेल्या मृतकाच्या परीवाराला अधिक मदत उपलब्ध करून द्यावी अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांना केली आहे या स्वरूपाचे निवेदन कारंजा तहसीलदार धिरज मांजरे यांना १० जानेवारी रोजी देण्यात आले यावेळी नगरसेवक जाकीर शेख,हमीद शेख,जुबेर पठाण व मोहसीन खान आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments