वाशीम, ता. 7 : तालुक्यातील सुकळी येथील घरकुलाचा सर्व्हे हा एकाच ठिकाणी तयार करून श्रीमंतांना या घरकुलाचा लाभ दिला व गोरगरीबांना वंचित ठेवण्यात आले असा आरोप सुकळी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदन केला. सदर निवेदन सोमवारी (ता.3) रोजी जिल्हा परिषद सभापती सुरेश मापारी यांना देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले की, ग्रामपंचायत सुकळी येथील घरकुलाचा सर्व्हे करण्यात आला. हा सर्व्हे करताना संबंधित कर्मचाऱ्यांनी गावात गोरगरीबांची घरे न बघता एकाच ठिक़ाणी बसून सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये ज्यांची घरे पक्क्या स्वरूपाची आहेत जे ग्रामस्थ श्रीमंत व आपल्या मर्जीतील लोकांची नावे सर्व्हेमध्ये घेण्यात आली. खरे गोरगरीब व कच्या घरातील ग्रामस्थांना या घरकुल योजनेमधून वंचित ठेवण्यात आले. झालेला सर्व्हे पात्र आणि अपात्र तसेच काही ग्रामस्थांची नावेच नाहीत अशा गरजु लोकांचा सर्व्हे पुन्हा करण्यात यावा अन्यथा पंचायत समिती प्रांगणात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सुकळी येथील ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय घेवून सुकळी येथील ग्रामस्थांना कळविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सदर निवेदन देतेवेळेस शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव सावके, शिवसेना वाशीम शहरप्रमुख गजानन भांदुर्गे तसेच सुकळी येथील शिवाजी बेद्रे, कुमार लोखंडे, माधव कानडे, तानाजी बेंद्रे, रामेश्वर कानडे, बापुराव हाटकर, लक्ष्मण मोरे, गोविंदराव कानडे, सकुबाई हाटकर, सरूबाई हाटकर, शंकर मोरे, संतोष बेद्रे, संतोष कानडे, शोभाबाई कानडे, संतोष लोखंडे, किसन लोखंडे, अशोक कानडे, अमोल कानडे, राजु खोंडे, दिनेश भिसे, दिपक लोखंडे, नंदु लोखंडे, काशिराम लोखंडे, परशराम लोखंडे, आत्माराम बर्वे, गजानन बर्वे, दत्ता मोरे, रामहरी मोरे, महादेव मोरे, राजू लोखंडे, मधुकर भिसे, विठ्ठल कानडे, सौंदराबाई मोरे, कुंडलीक लोखंडे, दिनेश मोरे, कलाबाई धनगर, बंडु खडसे, प्रमोद खडसे यांची उपस्थिती होती.
0 Comments