Ticker

6/recent/ticker-posts

माॅ जिजाऊ जयंतीपासून जिल्ह्यातविघपदि नारीजोड अभियान




         : --  लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड या सामाजिक संघटनेच्या वतीने १२ जानेवारी रोजी येत असलेल्या माॅ जिजाऊ यांच्या जयंतीपासून वाशिम जिल्ह्यामध्ये विधवा , घटस्फोटित परित्यक्ता , दिव्यांग म्हणजेच " विघपदि नारीजोड अभियान " प्रारंभित करण्यात येणार आहे . 
        या " विघपदि नारीजोड अभियान " ची  ; १) शिक्षण , २) रोजगार , ३) ठिकाणा , ४) स्त्रिसुरक्षा  आणि ५) निरोगीपणा . अशी पंचसूत्री राहणार असून तिच्या अंमलबजावणीसाठी  व्यापक प्रमाणात लढा उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे .
      विधवा , घटस्फोटित परित्यक्ता आणि दिव्यांग महिलांना आपल्या व्यक्तीगत व कौटुंबिक जीवन स्तरावर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि यापैकीच्या एकेक समस्यांचा निपटारा करता करता त्यांची दमछाक होते . या घटकांच्या जटिल प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधल्या जावे आणि त्यांचे न्याय्य हक्क त्यांना प्राप्त व्हावे याकरिता हे  ' विघपदि नारीजोड अभियान ' विशेषकरून राबविण्यात येत आहे . 
         लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड या सामाजिक संघटनेचा कार्यविस्तार चोविस जिल्ह्यामध्ये झालेला असून वाशिम जिल्ह्यानंतर राज्यस्तरीय स्वरूपात म्हणजेच २४ जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवण्याचा निर्धार  ले.अ.क्रां. चे मुख्य संयोजक गंगाधर कांबळे यांनी व्यक्त केला असून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी  " विघपदि " महिलांनी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहन ललिता चौधरी , पद्मा मोहड , सुरेश वानखेडे  यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments