कारंजा- श्री बाबासाहेब धाबेकर विद्यालय, यावर्डी या शाळेमध्ये वयोगट 15 ते 18 वर्ष विद्यार्थ्यां मधील वर्ग 9 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनसाठी लसीकरण मोहीम आरोग्य विभागा मार्फत राबविण्यात आली. या मध्ये वर्ग 9,10 वीच्या 62 पैकी 57 विद्यार्थांच म्हणजे 92 % लसिकरण झाले.
या लसीकरणासाठी लोणी प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या डॉ. अभिलाषा लकडे,ए.एन एम श्रीमती मते,एम पी डब्ल्यू नासिर खान,डाटा एण्ट्री ऑपरेटर शजभं शेन्द्रे,आशा सेविका शिलाबाई इंगोले,उज्वला कडू,ग्रा.प.यावार्डीचे पोलीस पाटिल सुनिल पाटिल ठाकरे,ग्रामसेवक अमोल पाटिल,सरपंच प्रतिनिधि विठ्ठल जमाले,ग्रा.प.सेवक विवेक पोहेकर आदि उपस्थित होते.
लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी शाळेचे
मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक राजेश शेंडेकर, शालिनि ओलिवकर, गोपाल काकड, अनिल हजारे, शिक्षकेत्तर कर्म. देविदास काळबांडे,भालचंद्र कवाने, राजू लबडे, राजेश लिंगाटे, राजेश उमाळे यांनी अथक प्रयत्न केले.
0 Comments